शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाला अनधिकृत वीजपुरवठा

By admin | Updated: November 15, 2014 01:54 IST

शेतकऱ्यांकडून डिमांडची रक्कम घेत त्याचा डिमांड न भरता कृषी पंपांना वीज पुरवठा दिल्याचा प्रकार कारंजा (घाडगे) येथे माहिती अधिकारातून उजेडात आला आहे.

रुपेश मस्के कारंजा (घाडगे)शेतकऱ्यांकडून डिमांडची रक्कम घेत त्याचा डिमांड न भरता कृषी पंपांना वीज पुरवठा दिल्याचा प्रकार कारंजा (घाडगे) येथे माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. यात कारवाईचा बडगा येण्याच्या भीतीपोटी सहायक अभियंत्याने सोनगाव (रिठ) येथील दोन शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिलेला वीज पुरवठा खासगी कंत्राटदाराच्या कामगारांच्या सहकार्याने कापल्याने खळबळ माजली आहे. या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या दोन शेतकऱ्यांना दाभा वीज वितरण केंद्र क्रमांक २ चे सहाय्यक अभियंता शेटे यांनी सहा महिन्यांपूर्वी वीज पुरवठा दिला होता. हा पुवठा अचानक कापल्याने शेतकरी उषा प्रमोद चव्हाण, रा. कारंजा व सुभाष नत्थुजी चौधरी, रा. उमरी यांच्या शेतातील पीक धोक्यात आले आहे. याबाबत सदर शेतकऱ्यांनी विचारणा केली असता कंत्राटदाराला हाताशी धरुन सहाय्यक अभियंत्याने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना दीड वर्षांपूर्वी सहाय्यक अभियंता शेटे यांनी कृषिपंपाचा वीजपुरवठा दिल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवाय त्यांचा वीजपुरवठा हा सहा महिन्यांपासून सुरळीत सुरू होता. गत काही दिवसांपासून कृषी पंपाच्या दाबाच्या तक्रारी वाढल्या. यामुळे येथील शेतकरी साहेबराव बैंगणे यांनी वीज वितरण कार्यालयात अनेकवेळा तक्रारी केल्या; परंतु उपयोग न झाल्याने या संदर्भात माहिती अधिकारात अर्ज टाकून या रोहित्रावरील अधिकृत ग्राहकांची यादी मागविली. यात रोहित्रावर कृषी पंपाच्या जोडण्या खूपच कमी असल्याचे समोर आले. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांकडून सहायक अभियंत्याने डिमांडची रक्कम घेतली; परंतु शेतकऱ्यांना डिमांडच दिले नसल्याचेही अधिकारात समोर आले. पितळ उघडे पडण्याच्या धाकाने सदर सहायक अभियत्याने ११ नोव्हेंबर रोजी अचानक दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करून संपूर्ण पुरवठाच काढुन टाकण्याचा बेत आखल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलिताचा प्रश्न पडला आहे.