शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पिस्तूल बाळगणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

राष्ट्रीय महामार्ग सात वर स्थिर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसणाखाली एक पिस्तूल अधिकाऱ्यांना दिसून आली.

ठळक मुद्देदहा काडतूस जप्त : बसमधून करीत होता प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : विना परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास वडनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल व दहा काडतूर तसेच दारूची शिशी असा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर-हैद्राबाद मार्गावर असलेल्या स्थिर निगरानी पथकाद्वारे नागरिकांच्या साहित्याची तपासणी करण्यात येत असून याच ठिकाणी अदिलाबाद ते नागपूर असा बसने प्रवास करीत असलेल्या सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम (३५) रा. अदिलाबाद, असे ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग सात वर स्थिर निगरानी पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी मोहीम राबविली जात होती. याच दरम्यान ए.पी. ०१ झेड. ००४५ क्रमांकाची बस अडवून त्यातील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी सुरू असताना बसच्या मागील आसणाखाली एक पिस्तूल अधिकाऱ्यांना दिसून आली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता बसच्या बाहेर दहा जीवंत काडतूर आढळून आले. त्यानंतर सदर घटनेची तातडीने वडनेर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये यांची त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर बस आणि बस मधील प्रवाशांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शिवाय ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशी दरम्यान साहित्य तपासणीसाठी बस थांबताच बस मधील मागील आसणावरील एक इसम पटकन पुढील आसणावर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शेख हैदर शेख ईब्राहीम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर पिस्तूल व जीवंत काडतूर त्याच्याच जवळ होते आणि तपासणीत आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे साहित्य फेकण्यात आल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. शेख हैदर शेख ईब्राहीम याच्यावर वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी अरविंद तुराळे, आकाश कसर, अरुण गुगळे, सुरज मेश्राम, शुभम वानखेडे, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, यादव यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.शस्त्र बाळगण्याच्या उद्देशाचा घेतला जातोय शोधपोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश येथील रहिवासी असलेल्या शेख हैदर शेख ईब्राहीम हा कुठल्या कारणाने शस्त्र बाळगत होता. इतकेच नव्हे तर त्याचा घातपाताचा इरादा तर नव्हता ना आदीचाचा शोध सध्या पोलीस आहेत.पिस्तूल बाळगणाºया संशयीताला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा काडतूस, एक पिस्तूल, दारूची शिशी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे.- आशीष गजभिये, ठाणेदार, वडनेर.

टॅग्स :Policeपोलिस