शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

स्प्रिंकलरच्या अनुदानासाठी दोन वर्षांपासून फेर्‍या

By admin | Updated: May 23, 2014 00:08 IST

शासनाच्या योजनेनुसार ज्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे त्या शेतकर्‍यांनी स्प्रिंकलर घेतले. मात्र या योजनेचा लाभ उचलणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानाकरीता कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.

वर्धा : शासनाच्या योजनेनुसार ज्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे त्या शेतकर्‍यांनी स्प्रिंकलर घेतले. मात्र या योजनेचा लाभ उचलणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानाकरीता कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. असाच अनुभव येथील हर्षल रमेश झाडे नामक शेतकर्‍याला आहे. ते गत दीड महिन्यापासून अनुदानाकरिता त्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. हर्षल झाडे हे वर्धेला राहतात. त्यांची देवळी तालुक्यातील बोपापूर(दिघी) येथे साडेआठ एकर शेती आहे. शेतात त्यांनी सेंद्रीय भाजीपाला लावला आहे. हर्षल झाडे यांनी देवळीतील साई मशिनरीमधून अनुदानावर स्प्रिंकलर खरेदी केले होते. सर्व मशीनरीने याचा प्रस्ताव देवळी येथील कृषी विभागाकडे पाठविला. याला तीन महिने लोटूनही अनुदान प्राप्त न झाल्याने हर्षल झाडे देवळी येथील कृषी विभागात गेले, तिथे विचारले असता कर्मचार्‍यांनी त्यांना तुमच्या अनुदानाचा धनादेश आज किंवा उद्या येईल असे सांगितले. सोबतच तुमचा प्रस्ताव १०० टक्के पूर्ण झाला आहे. तसा एसएमएस तुमच्या मोबाईलवर येईल असे सांगितले. एसएमएस आला नसल्याने हर्षल झाडे परत कृषी विभागात गेले असता तुमच्या प्रस्तावात त्रुट्या आल्याने प्रस्ताव पुन्हा डिलरकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखा विभागातील एका महिला कर्मचार्‍याने सांगितले. पहिले प्रस्ताव १०० टक्के झाल्याने सांगून दुसर्‍यांदा त्रुट्या कशाकाय निघू शकतात. असा प्रश्न उपस्थित होत आहे. झाडे डिलरकडे गेले असता डिलरने सांगितले की ही आमची सेवा आहे आमच्यावर दबाव टाकू नका; परंतु, डिलरनेच प्रस्ताव उशीरा पाठवला. आता जवळपास दोन वर्षे होत आले. अद्यापही अनुदान प्राप्त झाले नाही. या प्रकरणाचा निकाल लावून चौकशी करून अनुदान देण्याची मागणी हर्षल झाडे यांनी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)