शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्यायच

By admin | Updated: June 18, 2016 01:35 IST

या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे.

हिंगणघाट : या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. सद्यस्थितीत व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांपासून सर्वच दुखी असून हेच काय ते अच्छे दिन म्हणून जनता पश्चाताप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाने केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. जुन्या महत्त्वपूर्ण योजना बंद करणे व काहीचे नावात फेरबदल करून पुन्हा त्याच राबविणे या शिवाय दुसरे काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. शेती संबंधी कवडीचे ही ज्ञान नसल्याकडून शेती संबंधी निर्णय घेण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप पटेल यांनी केला. तालुका स्तरावरील ही बाजार समिती शासन योजनांपलीकडे जावून शेतकऱ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविते ही बाब भुषणावह असल्याचे सांगून सभापती अ‍ॅड कोठारी व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.प्रास्ताविक करताना बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी २००० साली ७० कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीची उलाढाल १४०० कोटीवर पोहचल्याचे सांगितले. यंदाच्या १२ कोटीच्या उत्पनातून खर्च वजा जाता शुद्ध नफा ६ कोटी असल्याचे ते म्हणाले. गत १५ वर्षांत शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदु मानत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या एक रुपयात भरपोट जेवण, एक रुपयात निवास व चहापाण्याची सोय, स्मशानभूमी तेथे विहीर, बसस्थानका पर्यंत मोफत बस सेवा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर लॅपटाप, व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्के अनुदान, पांदण व सिंचन योजनेसाठी अनुदान , शौचालयासाठी आर्थिक मदत शाळा व आंगणवाडींना पख्यांचे वाटप, कृषीवर आधारित चर्चासत्र आदी संबंधी कार्याची त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी मंचावर उपस्थितीत अतिथींनी अ‍ॅड. कोठारी यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीत बैल मृत्यूमुखी तसेच घर जळालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते आर्थिक मदत तसेच अंगणवाडीला विजेचे पंखे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालीया यांनी केले तर आभार उपसभापती वडतकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)