शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची कारला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्याने कारचा समोरील काच फुटला तसेच धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देदोघांकडून दगडफेक : ठाकरे मार्केट परिसरात काही काळ तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भरधाव दुचाकी कारवर जाऊन धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दुचाकीवरील दोघांनी कारवार दगडफे क केल्याने कारच्या समोरील काचा फुटल्या. ही घटना सकाळी साडेदहा वाजता ठाकरे मार्केट परिसरात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण होऊन वाहतूक ठप्प झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एम.एच.३२ ए.एच. ६५०७ क्रमांकाची कार बजाज चौकाकडे जात होती. यादरम्यान ठाकरे मार्केट परिसरातील हॉटेल रामाकृष्णासमोर विरुद्ध दिशेने जाणारी भरधाव दुचाकी कारवर धडकली. या अपघातानंतर दुचाकीवरील दोन युवकांनी कारवार दगडफेक केल्याने कारचा समोरील काच फुटला तसेच धडकेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली असता दुचाकीस्वार पसार झाले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याने शहर पोलिसांनी धाव घेत रस्ता मोकळा केला. यासंदर्भात अधिक महिाती जाणून घेण्याकरिता शहर पोलीस पोलीस ठाण्यातील दुरध्वनीवर संपर्क साधला असता आऊट आॅफ सर्व्हीस दाखवत होता. त्यामुळे अधिकची माहिती मिळू शकली नाही.शहरात दुचाकीस्वारांचा धुमाकूळशहरात सुसाट दुचाकी चालविणाऱ्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढतच असल्याने शहरातील रस्त्यांवरुन चालणे कठीण झाले आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळासह मुख्य मार्गाने सुसाट वाहने दामटविली जातात. रात्री तर दुचाकी रेस करीत वाहने पळविली जाते. एखाद्याला कट लागल्यावर युवकांना हटकल्यास त्यांच्या अंगावर चाल करुन जाणे किं वा शिवीगाळ करणे, हे प्रकार नित्याचेच असल्याने सुसाट दुचाकी पळविण्याऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघात