शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: January 16, 2016 02:30 IST

सावंगी येथील एका चहा कॅन्टीनमधून व्यावसायिक सिलिंडर व दोन जर्मनी गंज चोरीला गेले. मंगळवारी घडलेल्या या चोरीचा तपास करताना सावंगी (मेघे) पोलिसांच्या हाती...

तीन चोऱ्यांची कबुली : अन्य चोऱ्यांतील मुद्देमालही जप्तवर्धा : सावंगी येथील एका चहा कॅन्टीनमधून व्यावसायिक सिलिंडर व दोन जर्मनी गंज चोरीला गेले. मंगळवारी घडलेल्या या चोरीचा तपास करताना सावंगी (मेघे) पोलिसांच्या हाती शुक्रवारी दोन अट्टल चोरटेच लागले. यात त्यांच्याकडून अन्य चोऱ्यांमधील मुद्देमालही जप्त करण्यात आला. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या गेटजवळील चहा कॅन्टीनच्या चारचाकी ठेल्यातून अज्ञात चोरट्याने एक व्यावसायिक सिलिंडर, दोन जर्मनी गर्ज, असा ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत विठ्ठल दादाजी राऊत (५५) रा. सावंगी (मेघे) यांच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून सावंगी पोलिसांनी किसना विठ्ठल अमृतकर (५४) रा. सावंगी व हरेशलाल सुंदरलाल वधवानी (५३) रा. दयालनगर वर्धा यांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून व्यावसायिक सिलिंडर जप्त करण्यात आले. जर्मनी गंजाबाबत त्यांनी माहिती दिली नाही. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीमध्ये त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचेच निष्पन्न झाले. त्यांनी अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली. यात राजेश बळवंत बावणकर रा. शिवनगर सावंगी (मेघे) यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी आलमारीतून सोन्याचे पॉलीश असलेली पोत व ४ हजार रुपये रोख, असा सहा हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे सांगितले. शिवाय अतुल वामन वाटकर रा. बोपापूर (दिघी) यांच्या सावंगी ते पालोती मार्गावर असलेल्या सलूनच्या दुकानातून एक एलईडी टीव्ही किंमत ११ हजार रुपये चोरल्याचेही कबुल केले. यावरून सावंगी पोलिसांनी किसना अमृतकर यांच्या घरातून सोन्याचे पॉलीश असलेली पोत किंमत २ हजार रुपये, एक हजार रुपये रोख, एलईडी टीव्ही, दोन गंज, एक व्यावसायिक सिलिंडर व चार घरगुती सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विशाल दांडगे, जमादार प्रकाश नागापुरे, रामदास बिसणे, प्रदीप राऊत, विकास अवचट, संघसेन कांबळे, नवनाथ मुंडे, दीपक गेडे आदींनी पार पाडली.(कार्यालय प्रतिनिधी)