ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:10+5:30

प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली.

The truck's hit the travels | ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक

googlenewsNext
ठळक मुद्देसात प्रवासी जखमी : नागपूर-अमरावती मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली. हा अपघात रविवारी नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात झाला. यात ट्रॅव्हल्समधील सात प्रवासी जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात ट्रॅव्हल्समधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: The truck's hit the travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात