शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना जमिनींच्या पट्ट्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: January 29, 2015 23:12 IST

जिल्ह्यात जंगलव्याप्त भागाला लागून असलेल्या गावातील आदिवासी समाजातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वनहक्क काद्यानुसार त्यांना जमिनी मिळणे

वर्धा : जिल्ह्यात जंगलव्याप्त भागाला लागून असलेल्या गावातील आदिवासी समाजातील नागरिकांना अद्याप जमिनीचे पट्टे मिळाले नाही. वनहक्क काद्यानुसार त्यांना जमिनी मिळणे अनिवार्य असताना यावर शासनाच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. याकडे राज्याच्या वनमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, कारंजा (घा़) आष्टी, आर्वी, तालुक्यातील अनेक गावातील भूमिहीन आदिवासींचे अनेक वर्षांपासून जंगलातील जमिनी अतिक्रमित करून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात़ अशा सर्व अतिक्रमित आदिवासींना वनहक्क कायदा २००६ नुसार जमिनीचे पट्टे मिळणे आवश्यक असताना अजूनही त्यांना ते मिळाले नाहीत़ आदिवासींना त्वरित जमिनीचे पट्टे मिळावेत, अशी मागणी आदिवासी नेते अवचित सयाम यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. सादर केलेल्या अतिक्रमित दाव्यात मोठ्या प्रमाणात त्रुट्या असल्याने ते परत आले आहे. याची माहिती जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना नाही. यामुळे त्यांना वन विभागाकडून सततचा त्रास सहन करावा लागत आहे़ उभ्या पिकांची नासाडी केल्या जाते काही ठिकाणी वन विभागाकडून संबंधित आदिवासींवर गुन्हे दाखल केल्या गेले आहेत. हा आदिवासींवर झालेला अन्यायच आहे, याकडेही लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ ची अंमलबजावणी ३१ डिसेंबर २००७ पासून सुरू झाली, वनहक्क कायदा २००६ च्या अंमलबजावणीसाठी राज्यात १५ हजार २ ग्रामसभा, ९४ उपविभागीय स्तरीय समित्या तर २८ जिल्हास्तरीय समित्या गठीत केल्या आहेत़ त्यांच्या सनियंत्रासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती गठीत केली गेली आहे़कायद्याची अंमलबजावणी तीन स्तरावर आहे़ ग्रामसभा वनहक्क समितीकडून दावा उपविभागीय समितीकडे सादर केला जातो़ उपविभागीय समितीकडून दावा शिफारस करून जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविल्या जातो़ जिल्हास्तरीय समितीकडून मान्य झालेले दावे अंतिम समजण्यात येतात़या सर्व प्रक्रियेत निकाली निघालेले प्रलंबित असलेले त्रुटी असलेले व नाकारल्या गेलेले दावे याबद्दलची माहिती आॅनलाईन करून विहित प्रपत्रात प्रत्येक स्तरावर पोहोचविण्याचे आदेश असतानासुद्धा ग्रामस्तरावर संबंधितांना माहिती होत नाही़ डाटा स्क्रीन तयार करून, संकेतस्थळे अद्ययावत करून या योजनेच्या अंमलबजावणीची व सनियंत्रण करण्याची जबाबदारी आयुक्त आदिवासी विभाग यांची असतानासुद्धा आदिवासींना ग्रामीण स्तरावर ग्रामसभेच्या स्तरावर जनसामान्यापर्यंत पोहोचविल्या जात नाही, हिच खरी शोकांतिका या योजनेची आहे़जिल्ह्यात अजूनही आदिवासींना अतिक्रमित जमिनीचे पट्टे मिळाले नाहीत़ शासनस्तरावर संबंधितांशी चर्चा केल्यावर तेही अनभिज्ञच असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)