शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 24, 2014 00:09 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी तालुक्यातील महिला-पुरूषांनी गुरूवारी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले़ गौरखेडा

तिढा आरक्षणाचा : निवेदनातून निर्णयाचा निषेधआष्टी (शहीद) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी तालुक्यातील महिला-पुरूषांनी गुरूवारी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले़ गौरखेडा चौक येथे गोंडी ध्वजारोहण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला़ आदिवासींच्या या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे़शहीद पंछी धुर्वे, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला़ धनगर ही एक जात आहे, त्याचा आदिवासी समाजाशी कोणताही संबंध नाही, धनगर ही आदिवासी जमात मूळची पश्चिम बंगालमधून अन्यत्र स्थलांतरीत झाल्याने ती बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश दिशेने १९५१ ते १९७१ च्या कालखंडात महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याचे संदर्भ आहे़ धनगड व धनगर हे वेगवेगळे असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे सोयरिक संबंध नाही़ धनगड ही मूळात आदिवासी जमात आहे़ त्यांना धानक, असे दुसरे नाव देण्यात आले आहे़ त्यांना ओरॉन वा उरॉब, असेही म्हणतात़ त्यांची मातृभाषा सादरी वा कुरूख आहे़ गोंड स्वत:ला राज म्हणून घेतात़ गोंडांना १२ देवापर्यंत पेनकुळी आहेत़ गोंड काली-कंकाली, भिवसन, सरोज पेन या देवांना मानतात़ धनगड घोसल माला, बडादेव, चिडीमाता यांना मानतात़ गोंडांत राज, कोलाम, परधान, पारधी, बैगा अशा गण जमाती आहेत़ यामुळे धरगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणू नये, अशी मागणीही आंदोलनाद्वारे करण्यात आली़शहरातून काढलेल्या मोर्चात धनगर समाजाला अनु़ जमातीमध्ये स्थान देऊ म्हणणाऱ्या लोकप्रनिधींचा निषेध करण्यात आला़ महिला पुरूष आदिवासी वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले होते़ यावेळी अवचित सयाम, दिलीप मडावी, मारोती उईके, पांडुरंग कोडापे, महादेव धुर्वे, ज्ञानेश्वर मडावी, महेंद्र शिंदे, दादाराव धुर्वे आदींच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले़(तालुका प्रतिनिधी)