शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात प्रवासात बंद पडल्या ६० बसगाड्या

By admin | Updated: May 23, 2014 00:06 IST

रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्‍या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे.

रूपेश खैरी - वर्धा

रस्त्याने प्रवासादरम्यान परिवह विभागाच्या बसगाड्या बंद पडणे काही नवीन नाही; मात्र एका महिन्यात प्रवाशी घेवून जाणार्‍या एक दोन नाही तर तब्बल ६० बसगाड्या बंद पडल्याची नोंद परिवहन विभागात आहे. प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याची सरासरी काढल्यास रोज दोन बसगाड्या बंद पडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. सुरक्षित प्रवासाकरिता परिवहन विभाग, असे म्हटल्या जाते; मात्र परिवहन विभागाच्या बसगाड्या भंगार झाल्याने हे ब्रीद आता खोटे ठरू लागले आहे. प्रवासी घेवून निघालेली परिवहन विभागाची बसगाडी ठरलेल्या वेळी ठरलेले अंतर कापून नियोजित गावी पोहोचेल याचा कुठलाही नेम राहिला नाही. परिवहन विभाच्या बसगाड्या रस्त्याने बंद पडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करीत पायदळ गाव गाठावे लागत आहे. रस्त्याने प्रवासादरम्यान बसगाड्या बंद पडण्याचा फटका परिवहन विभागालाही बसला आहे. याच कारणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात परिवहन विभागाच्या बसगाड्यांचा होणारा प्रासंगिक करार कमी होत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात पाच आगारातून परिवहन विभागाचा कारभार सुरू आहे. या पाचही आगारातील गाड्यांची दैना झाल्याने त्याचा त्रास बसगाड्यांतून प्रवास करणार्‍यांना अधिक बसत आहे. बसच्या कोणत्या खिडकीला काच नाही, आसन व्यवस्था नाही, बसचे बरेच भाग पडलेले असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. याचा फटका परिवहन विभागाला बसला असून वर्धा आगाराच्या अनेक बसगाड्यांना उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालान देण्यात आले आहेत. गाड्या चालान करण्याच्या प्रकरणात विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात एका अधिकार्‍याला निलंबितही व्हावे लागले. असे असले तरी यातून विभागाच्या अधिकार्‍यांनी या अधिकार्‍याच्या पाठीशी राहून त्याचे निलंबन रद्द केले. विभागाच्या पाठीशी एवढा अनुभव असतानाही वर्धा परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांकडून यातून कुठलाही धडा घेतला नाही. बसगाड्या रस्त्याने बंद पडण्याचा प्रकार सुरूच आहे. हा प्रकार वर्धा विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती असून या भंगार बसगाड्या अजूनही रस्त्यावर धावतच आहेत.