शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात घट आली होती. पण, सध्या चोरट्यांनी याचा फायदा घेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीच्या काळात वाढत्या चोऱ्या रोखणे हे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात घट आली होती. पण, सध्या चोरट्यांनी याचा फायदा घेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीच्या काळात वाढत्या चोऱ्या रोखणे हे देखील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.पतंजली दुकान फोडलेआर्वीनाका परिसरात असलेले पतंजलीचे दुकान चोरट्याने रात्रीच्या सुमारास फोडले. सुमारे दोन हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. आशिष मुडे हे आर्वीनाका परिसरात कुटुंबासह राहतात. ते पतंजलीचे दुकान चालविण्याचे काम करतात . रात्रीच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करीत अंदाजे दोन हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.१२ कोंबड्यांची चोरीविकास गणेश काळे रा. गणेशनगर बोरगाव यांनी त्यांच्या मालकीच्या १२ कोंबड्या शेतातील गोठ्यात ठेवल्या होत्या. चोरट्याने रात्रीच्या सुमारास त्यांच्या ७ हजार किंमतीच्या १२ कोंबड्या चोरून नेल्या. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पाणी तपासणी प्रयोगशाळेत चोरीशहरातील पाणी तपासणी प्रयोग शाळेत चोरट्याने चोरी करीत सहा बॅटºया चोरून नेल्या. अनुप रामचंद्र नागदेवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दिवसभर काम केले आणि ते रात्री निघून गेले. मंगळवारी कर्मचारी कार्यालयात आले असता त्यांना कार्यालयाच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसून आले. अनुप नागदेवे यांनी कार्यालयात जात पाहणी केली असता नऊ हजार किंमतीच्या युपीएस,पीएसच्या सहा बॅटरी चोरट्याने चोरून नेलेल्या दिसून आल्या. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.कृत्रिम रेतन केंद्रात चोरीवर्धा : गो.से.वाणिज्य महाविद्यालयासमोर असलेल्या कृत्रीम रेतन केंद्रात चोरट्याने चोरी करीत संगणक साहित्यासह इतर सहित्य असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने शासकीय कार्यालये दोन दिवसाआड कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने पशुधन विकास अधिकारी विवेक चिकाटे यांनी शनिवारी सकाळी कार्यालय उघडले. रात्रीच्या सुमारास कार्यालय बंद करून सर्व कर्मचारी घरी निघून गेले. मंगळवारी कार्यालयात आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने रात्रीच्या सुमारास चोरी करीत कार्यालयातील फ्रिज, प्रिंटर, द्रवनपात्रे असा एकूण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. विवेक चिकाटे यांच्या तक्रारीहून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Thiefचोर