शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून बीपीच्या गोळ्याच नाही

By admin | Updated: September 22, 2016 01:13 IST

६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण

आजार बळावले : रुग्णांना आर्थिक भुर्दंडकारंजा(घा.) : ६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात १० दिवसापासून बी.पी. (रक्तदाब) च्या गोळ्यांचा पत्ताच नाही. परिणामी रूग्णांना बाहेरून गोळ्या आणाव्या लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात सर्वत्र संसर्गजन्य आजाराच्या रूग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण रूग्णालयात बाह्य रूग्णांची संख्या दररोज ५०० ते ६०० च्या आसपास आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांतही गर्दी आहे. रूग्णांमध्ये टायफाईड सदृष्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यातच मागील सहा महिन्यांपासून शासनाकडून बी.पी.च्या औषधीचा (गोळ्यांचा) पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. स्थानिक स्तरावर बी.पी.च्या गोळ्यांची खरेदी करून रूग्णांना पुरविण्यात आल्या. परंतु १० दिवसांपासून स्थानिक फंड शिल्लक नसल्यामुळे बी.पी. च्या गोळ्या खरेदी करता आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे या गोळ्या खरेदी करण्याचे अधिकारही स्थानिक स्तरावर नसल्याचेही सांगण्यात येत आहे. वेळोवेळी सदर औषधीची आॅनलाईन मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पण पुरवठा झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात कमी क्षमतेच्या २.५ एमजी च्या गोळ्या प्राप्त होतील, असेही स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादे हे काही कामाकरिता ३० सप्टेंबर पर्यंत सुट्टीवर आहेत. त्यामुळे डॉ. प्रभाकर वंजारी हे प्रभार सांभाळत आहेत. सर्पदंश व कुत्रा चावल्यावर उपयोगात येत असलेल्या औषधीचा भरपूर साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी आवश्यक असल्येल्या बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. शासनाने त्वरित बी.पी. इतर प्रकारच्या आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा करावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल व बाहेरून महागडी औषधी विकत घ्यावी लागण्यात नाही अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)