शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

जिल्ह्यात सहा महिन्यांत बांधकाम कामगारांची संख्या झालीय दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:26 IST

बोगस नोंदणी जोरात : १ लाख ३४ हजार ९६० नोंदणीकृत कामगार

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून कामगारांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मध्यस्थांच्या माध्यमातून बोगस नोंदणीचा सपाटा सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेला राजकीय पाझर फुटायला लागल्याने जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांचा आकडा दुपटीने फुगला आहे. परंतु खरे कामगार अद्यापही लाभापासून वंचितच आहेत.

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या विकासाकरिता सन २०१२ मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची सुरुवात झाली. या मंडळाकडून साहित्यासोबतच पाल्यांना शिष्यवृत्ती व इतर अशा एकूण २८ योजनांचा लाभ दिला जातो. तेव्हापासून कामगारांची नोंदणी करायला सुरुवात झाली. सन २०१२ पासून तर ३१ मार्च २०२४ पर्यंत जिल्ह्यात ६४ हजार ५०५ नोंदणीकृत कामगार असल्याची नोंद जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे आहे. 

गेल्या एप्रिल महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७० हजार ४५५ कामगारांची भर पडली असून सध्या जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ९६० नोंदणीकृत कामगार असल्याची शासकीय आकडेवारी आहे. गेल्या सहा महिन्यांत कामगारांची आकडेवारी वाढली कशी, याचीही चौकशी होण्याची गरज आहे. 

ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र वाटप बंद, तरी कामगार नोंदणीचा जोर अस्थायी कामगारांना ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ग्रामसेवकांकडे आहे. पण, गावातील धनदांडग्यांनीही योजनेचा लाभ उचलण्यासाठी प्रमाणपत्र मागण्याचा सपाटा लावल्याने गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ग्राम- सेवकांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तरीही नोंदणी होत असल्याने मध्यस्थांनी ग्रामसेव- कांसह काही कंत्राटदारांचेही शिक्के व प्रमाणपत्र बोगस बनविल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

नोंदणी अधिकाऱ्यांची 'अर्थ'पूर्ण डोळेझाक जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये मध्यस्थांचा सुळसुळाट असून कामगार संघटनाच मध्यस्थांची भूमिका बजावत आहे. त्यामुळे बोगस कामगार नोंदणीचा धडाका सुरू आहे. कामगारांची नोंदणी करताना कागदपत्र तपासण्याची जबाबदारी नोंदणी अधिकाऱ्यांची आहे. परंतु कारंज्याच्या कामगाराने हिंगणघाटातील कंत्राटदाराचे प्रमाणपत्र जोडूनही नोंदणी करण्यात आली. इतकेच नाही तर समुद्रपूर तालुक्यातील कामगाराने देवळी तालुक्यातील ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र जोडले, तरीही नोंदणी करून लाभ देण्यात आल्याने नोंदणी अधिकारीही 'अर्थ'पूर्ण डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या सहा महिन्यांतील आकडेवारी दृष्टिक्षेपातएप्रिल - ७१८मे - ११८७२ जून - १०३९१जुलै - २३५६३ऑगस्ट - १९११४सप्टेंबर - ४७९५

टॅग्स :wardha-acवर्धा