शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जसापूर,बोंदरठाणा परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर, बोंदरठाणा, सावळी, किन्हाळा, एकार्जुन शेतशिवारात सध्या वाघाचा वावर आहे. इतकेच नव्हेतर जसापूर शेत शिवारात वाघाने श्वानाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देश्वानाचा पाडला फडशा। अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : आगरगाव येथील एका तरुणाला ठार केल्यानंतर जंगलाच्या दिशेने निघून गेलेल्या वाघाने पुन्हा शेतशिवाराकडे वाट धरल्याने जसापूर बोंदरठाणा भागातील ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. वाघाने श्वानाचा फडशा पाडल्याने या भागातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर, बोंदरठाणा, सावळी, किन्हाळा, एकार्जुन शेतशिवारात सध्या वाघाचा वावर आहे. इतकेच नव्हेतर जसापूर शेत शिवारात वाघाने श्वानाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.या भागातील अनेकांच्या शेतात सोयाबीनची कापणी करून पीक ढिग करून ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर अनेक शेतकºयांनी सोयाबीन पिकाची मळणी केलेली नाही. अशातच जिल्ह्यात असलेले ढगाळी वातावरण आणि शेत शिवारात वाघाचा वावर असल्याने हातचे पिकही जाण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.नागरिकांची समस्या लक्षात घेता वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांसह शेतकºयांची रास्त आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही केली पाहणीशेत शिवारात वाघ असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. शिवाय काही परिसराचीही यावेळी पाहणी करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या काही नागरिकांनी फटाके फोडून वन्यप्राण्यांना पळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Tigerवाघ