शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित, निकृष्ट बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी बंधने घातलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  ग्रामीण भागातील कडक निर्बंध शिथिल करीत बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोस्ट ऑफिस, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे पोहोचविण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. असे असले तरी निकृष्ट व अप्रमाणित बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतीशी निगडित कामे शेतकऱ्यांना करता येणार आहेत. तसेच त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी ७ ते ११ या वेळेत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतमाल नेण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा. काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील कृषीशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निविष्ठा किंवा शेतीशी निगडित अवजारे पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती करून द्यावी. कृषी केंद्र चालकांना विविध कंपन्यांमार्फत खते, बियाण्यांचा पुरवठा करण्याकरिता निविष्ठा गोदामामध्ये उतरविण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असलेला इंधन पुरवठा संबंधित पेट्रोल पंपधारकांनी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देश जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील बँका राहणार दोन वाजेपर्यंत सुरू

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांना अडचण आल्यास याची जबाबदारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येणार आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते १ पर्यंत सूरू राहतील तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंप दिवसभर सुरू राहतील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बँका सुरू राहणार आहेत. पीक कर्जाचे प्रस्ताव शेतकऱ्यांना करता येणार आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती