शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपूरच्या उद्धट गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: June 19, 2016 01:57 IST

समुद्रपूर पंचायत समितीत कार्यरत गट विकास अधिकारी विजय लोंढे हे सातत्याने शिक्षक आणि संघटना प्रतिनिधींना उद्धटपणे बोलून...

सीईओंना निवेदन सादर : प्राथमिक शिक्षक संघाची मागणीवर्धा :समुद्रपूर पंचायत समितीत कार्यरत गट विकास अधिकारी विजय लोंढे हे सातत्याने शिक्षक आणि संघटना प्रतिनिधींना उद्धटपणे बोलून हुकूमशाहीचे धोरण अवलंबित अपमान करीत असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. या निवेदनात सदर अधिकाऱ्यांवर करण्याई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर सदर अधिकाऱ्यांकडून उत्तर मागविण्याच्या सूचना सीईओ गुंडे यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गत शिक्षकांचे एप्रिल २०१६ च्या वेतनास होणारा संभाव्य विलंब लक्षात घेता शिक्षण विभागातील वेतन देयक विभागात कर्मचारी नियुक्त करून वेतन तातडीने करण्याची कार्यवाही करावी यासाठी शिक्षक संघाचे प्रतिनिधी गटविकास अधिकाऱ्याची भेट घेण्याकरिता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडून शिक्षकांना उद्धट वागणूक देण्यात आली. वेतनास होत असलेल्या विलंबामुळे संघटनेच्यावतीने टाळ मृदंग गजर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत वर्धा जिल्ह्यातील शिक्षक वेतन व पैशासाठी फार दरिद्री असल्याचे दिसते, असे वक्तव्य गटविकास अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांकरिता ५ जून २०१६ रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात आलेले शिक्षकवृंद उन्हापासून बचावाकरिता कार्यालयात आश्रय घेत होते. तर त्यांनाही या अधिकाऱ्यांकडून गेट आऊट म्हणून हाकलून लावण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आला. समुद्रपूर शिक्षण विभागात शिक्षकांच्या वेतन अपहार प्रकरणी दोषी लिपीकावर सदर गटविकास अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संदर्भात पोलिसात तक्रारही नोंदविली नाही. यामुळे सदर अपहार प्रकरणी गटविकास अधिकारी पं.स. समुद्रपूर यांची भुमिका संशयास्पद असल्याचे संघाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर अधिकारी शिक्षकांच्या भावनांशी खेळत असून या संदर्भात मोठा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील, असा इशारा शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला असून या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)