शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर तांदूळच स्वप्निलचा आहार

By admin | Updated: June 6, 2014 00:09 IST

लहान मुलं म्हटले की त्यांच्या बालसुलभ सवयींची सगळ्यांनाच हौस असते. चॉकलेट, ट्रॉफी, बिस्कीटे, नुडल्स, आईस्क्रीम ही बालपणाच्या हट्टाची जेवणाची व खाण्याची मौज म्हणून बालकात दिसून येते.

वय वर्षे १५ : बालपणापासूनच जेवण नाहीआर्वी : लहान मुलं म्हटले की त्यांच्या बालसुलभ सवयींची सगळ्यांनाच हौस असते. चॉकलेट, ट्रॉफी, बिस्कीटे, नुडल्स, आईस्क्रीम ही बालपणाच्या हट्टाची जेवणाची व खाण्याची मौज म्हणून बालकात दिसून येते. परंतु या सर्व बालसुलभ सवयींना अपवाद ठरला आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील बालक स्वप्नील जगदीश मोहेकर. वय वर्षे १५. उंची ३ फूट. बालपणीच आईचे छत्र हरपले. वडील व आजोबांनीच त्याला आई आणि वडिलाची माया देऊन लहानाचे मोठे केले. बालसुलभ वयासोबतच वाढत्या वयाबरोबर त्याला जेवणाची सवय लावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु स्वप्नील जेवणाच्या ताटाकडे ढुकूंनही पाहत नाही. जेव्हापासून त्याला समज आली त्या वयापासून घरातील डब्यात असलेल्या तांदळाचे मुठभर दाणे घेवून एक-एक दाना तोंडात टाकून तेच दिवसभर पुरवितो. तेच त्याचे जेवण.स्वप्निलचे वडील जगदीश गुराख्याचे काम करतात. तर त्याचे आजोबा सोमाजी हे वर्धमनेरी आश्रमातील गोशाळेतील गुरांची देखभाल करतात. स्वप्नील आजोबासोबत दिवसभर भानुदास महाराज यांच्या आश्रमात राहतो. स्वप्निलचा जेवण न घेता तांदळाच्या दान्यावर आपला उदर निर्वाह करतो. ही बाब पंचक्रोशीत   कुतुहलाचा विषय बनली आहे. अन्नाशिवाय माणूस जीवंतच राहत नाही असे म्हणतात पण स्वप्निल याला अपवाद ठरला आहे.  विज्ञान व डॉक्टर पेशातील मंडळीसाठी स्वप्निलचे तांदूळ खाऊन जगणे निश्‍चितच विचार करायला भाग पाडणारे आहे. तो पंधरा वर्षांचा झाला तेही तांदळाच्या आहारातूनच.   स्वप्निल सामान्य मुलांप्रमाणेच वाढतो आहे. आता त्याच्या शरीराला तांदळाची सवड जडली आहे.  या त्याच्या तांदूळ खाण्याच्या अफलातून जगण्याने गावकर्‍यांनी त्याचे ‘साधू’ असे नामकरण केले आहे. गावात व मंदिर परिसरात अनेक विवाह साहेळे होतात. त्याला गावकरी मोठय़ा आवडीने जेवायला बोलवितात, पण तो अन्नाचा एक घास ही खात नाही. गरीब असो वा श्रीमंत आता त्याला कुणीही जेवणाचा आग्रह करीत नाही. तो घरून निघतो तो खिशात         मुठभर तांदूळ भरूनच. दिवसभर एक-एक दाणा चिमणीसारखा दिवसभर खात राहतो. तो शाळा शिकत      नाही. दिवसभर आजोबासोबत आश्रमातच राहतो. (तालुका प्रतिनिधी)