शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 194 पोलिसांच्या समस्यांचे पोलीस अधीक्षकांकडून झाले ‘समाधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 05:00 IST

पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘समाधान’ या शीर्षकाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. ७७७५००२७५० या हेल्पलाइनच्या माध्यमातून अर्जित रजा, वैद्यकीय रजा, पेन्शन, घरभाडे भत्ता मंजुरी, वैद्यकीय बिले, वेतननिश्चिती, वेतनवाढ, कसुरी, बक्षिसे, शीट रिमार्क, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, बदली वगैरे या विषयांबाबत समस्या, तक्रारी दाखल करून घेतल्या जातात.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन अडचणी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने ‘समाधान’ हेल्पलाइन सुरू केली आहे. सेवानिवृत्त व सेवेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन समस्या सोडविण्यासाठी या हेल्पलाइनचा उपयोग केला जात आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १९४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या, अडचणी हेल्पलाइनवर नोंदविल्या असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी त्यांच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करून त्यांचे ‘समाधान’ केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘समाधान’ या शीर्षकाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. ७७७५००२७५० या हेल्पलाइनच्या माध्यमातून अर्जित रजा, वैद्यकीय रजा, पेन्शन, घरभाडे भत्ता मंजुरी, वैद्यकीय बिले, वेतननिश्चिती, वेतनवाढ, कसुरी, बक्षिसे, शीट रिमार्क, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, बदली वगैरे या विषयांबाबत समस्या, तक्रारी दाखल करून घेतल्या जातात. या कक्षातील पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस तारा ताकसांडे या समस्यांची नोंद घेऊन त्यांच्या समस्या निवारण करण्यास प्राधान्य देत पोलीस निरीक्षकां (कल्याण)मार्फत त्यांच्या तक्रारींशी संबंधित पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांची वेळ घेऊन भेटण्यास सांगतात. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल १९४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे समाधान केले आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत असून झटपट निपटारा होत असल्याने दिलासा आहे.

कर्मचाऱ्यांकडून उपक्रमाचे स्वागत- ‘समाधान’ कक्षाच्या उपक्रमाचे अनेक कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. केवळ संबंधित विभागाच्या लिपिकाच्या चालढकल धोरणामुळे क्षुल्लक प्रश्न प्रलंबित राहतात. - आता समाधान कक्षामुळे हक्काच्या न्याय्य मागण्या गतीने मान्य होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून ‘समाधान’ उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.  - कर्मचारी निडर होवून आपल्या समस्या सांगत आहे

 

टॅग्स :Policeपोलिस