शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा भुयारी मार्ग देतो अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गावातून वाबगाव, गणेशपूर, सैदापूर, खर्डा, बोपापूर, ममिनपूर या गावावरून पुढे अंदोरी व यवतमाळ जिल्हा राळेगाव येथे जाण्याचा मार्ग आहे.

ठळक मुद्देसात गावाला जोडणारा मार्ग : पाणी, गाळामुळे वाट झाली बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम काही भागापर्यंत पूर्ण झाले. या मार्गावरील काही गावाच्या संपर्काकरिता भुयारी मार्गाची निर्मिती केली. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्ग केल्याने पावसाळ्यात येथून जाताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गावातून वाबगाव, गणेशपूर, सैदापूर, खर्डा, बोपापूर, ममिनपूर या गावावरून पुढे अंदोरी व यवतमाळ जिल्हा राळेगाव येथे जाण्याचा मार्ग आहे. याच मार्गाने या भागातील नागरिक भिडी येथे ये-जा करीत असतात. मात्र, हुसनापूरजवळील भुयारी मार्गावरील पुलाची उंचीसुद्धा कमी असून या पुलाचे बांधकाम जमिनीच्या समांतर केल्याने डांबरी रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी साचून राहते. मोठ्या प्रमाणावर गाळ असतो.गाळामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघातास सामोर जावे लागत. तर या मार्गावरून शेतकऱ्यांना शेतात खत बियाणे कसे न्यावे, असाही प्रश्न पडला आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना कळवूनसुध्दा ते काम आमचे नाही, ते कंत्राटदारांचे आहे, असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. याकडे रेल्वेच्या संबंधितअधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मार्गावर साचलेले पाणी व गाळ साफ करून मार्ग रहदारीकरिता मोकळा करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे