बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:19 AM2017-11-30T00:19:13+5:302017-11-30T00:19:30+5:30

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी,....

Submit fraud cases to seed companies | बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

Next
ठळक मुद्देभाजपा किसान मोर्चाची मागणी : एकरी २५ हजारांची मदत गरजेची

वर्धा : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकºयांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये शासकीय मदत द्यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाने केली.
जिल्ह्यात मागील वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत कापसाची ९ लाख ५६ हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. यंदा ही आवक ३ लाख ४७ हजार इतकीच झाली आहे. एका अमेरिकन कंपनीने बीटी कपाशीचा बीजी ११ हे वाण प्रसारित केली. अनेक वर्षांपासून याची रॉयल्टी सदर कंपनी घेत आहे. रॉयल्टीच्या नावावर कंपनीने अब्जो रुपये घेतले आहे. यामुळे बोंडअळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीद्वारे भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे वा शासनाने एकरी २५ हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली. याबाबत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. यावेळी प्रशांत इंगळे तिगांवकर, जयंत येरावार, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, जयंत कावळे, नंदू झोटींग, महेश आगे, दिनकर उमक, गंगाधर डाखोळे, कवडू महल्ले, नामदेव पाटील, आदी उपस्थित होते.
फेर पैसेवारीचे आदेश द्या
जिल्हा प्रशासनाने पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक काढली. अंतिम पैसेवारीमध्ये बोंडअळीग्रस्त कपाशी, सोयाबीनची नापिकी याचा विचार करता पैसेवारी ३० टक्के पेक्षाही कमी येते. यामुळे फेर आकारणीकरिता योग्य आदेश द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाºयांना दिले कपाशीचे बोंड
बोंडअळीच्या वास्तवाबाबत जिल्हा प्रशासनाला अवगत करण्यासाठी कपाशी उत्पादक शेतकºयांनी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांना कपाशीचे बोंड भेट दिले. यावेळी त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना केली.

Web Title: Submit fraud cases to seed companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.