विद्यार्थ्यांना सुटी, शिक्षक-कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:47+5:30

राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्च पासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

Students on vacation, teacher-staff duties | विद्यार्थ्यांना सुटी, शिक्षक-कर्मचारी कर्तव्यावर

विद्यार्थ्यांना सुटी, शिक्षक-कर्मचारी कर्तव्यावर

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध : प्रशासनाच्या आवाहनाला साद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना व्हायरसला पायबंद घालण्याच्या दृष्टीने सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना शाळा व्यवस्थापनाला केल्या होत्या. त्यानुसार सोमवारी अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. मात्र, शाळेतील शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी आपल्या कर्तव्य बजावत होते. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनीही साथ दिल्यास कोरोनाला पळवून लावण्याकरिता वेळ लागणार नाही.
राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्च पासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. मात्र, या आदेशाबद्दल ग्रामीण आणि शहरी भाग यासंदर्भात अनेकांमध्ये संभ्रमावस्था होती. सोमवारी सकाळी बहुतांश शाळा, महाविद्यालये सकाळी नियोजित वेळेमध्ये उघडण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनांनी संपर्क साधून खातरजमा करून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा हा आदेश शहरासह ग्रामीण भागाकरिताही लागू असल्याने आता ३१ मार्चपर्यंत सर्वत्र शाळा, महाविद्यालये बंद राहणार असून शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून आपले कामकाज पूर्ण करायचे आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या आदेशानुसार शहर व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या काळात अध्यापन बंद राहणार असून शालेय कामकाज शिक्षक व कर्मचाऱ्यांना करायचे आहे.
-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

Web Title: Students on vacation, teacher-staff duties

टॅग्स :Schoolशाळा