शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाचा उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली होती. विजांचा कडकडाट सुरू असल्याने रसुलाबाद येथील मंगेश माधव भलमे याने बाऱ्हा सोनेगाव भागातील शेतातील गोठ्यात आश्रय घेतला.

ठळक मुद्देएक जखमी : नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यरात्री आणि रविवारी पहाटे वर्धा जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे उभ्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. रसुलाबाद परिसरात वीज पडल्याने एक व्यक्ती जखमी झाला. तर चिकणी जामणी परिसरात तुरीच्या आकाराची गार पडली. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने सर्वेक्षण करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली होती. विजांचा कडकडाट सुरू असल्याने रसुलाबाद येथील मंगेश माधव भलमे याने बाऱ्हा सोनेगाव भागातील शेतातील गोठ्यात आश्रय घेतला. अशातच वीज पडल्याने मंगेश जखमी झाला. त्याला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चिकणी जामणी परिसरात वादळी वाऱ्यासह तुरीच्या आकाराच्या गारांचा पाऊस झाला. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सेवाग्राम भागात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तर रविवारी सकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले.दहा गोठ्यांवरील छत उडालेकोरा : अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे परिसरातील दहा गोठ्यांवरील टिनपत्रे उडाले. तर काही पाळीव जनावरे जखमी झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे वैरण पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचा चांगलाच फटका बसला आहे. प्रफुल पंढरे यांच्या शेतातील गोठ्यावरील टिना उडाल्या. शिवाय गोठ्यातील ३२ क्विंटल कापूस, चार क्विंटल चणा तसेच जनावरांचा चारा भिजला. तसेच काशिनाथ पंढरे, नारायण पडवे यांच्या मालकीची जनावरे जखमी झाली. जीतेंद्र पंढरे, राजू पंढरे, गजू पंढरे, प्रमोद पंढरे, बंडू पंढरे, आत्माराम सुर्यवंशी, हरिभाऊ गुंडे, कमला पडवे यांच्या शेतातील गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी सुरजूसे तसेच सुभाष लोखंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.वीज पडून बैलजोडी दगावलीसेवाग्राम : वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून बैलजोडी दगावली. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या जऊळगाव शिवारात घडली. बैलजोडी दगावल्याने शेतकरी रमेश झिलपे यांचे १ लाखांचे नुकसान झाले आहे. रमेश झिलपे यांनी त्यांच्या मालकीची बैलजोडी शेतात बांधून ठेवली होती. दरम्यान ही घटना घडली.नंदोरी परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा, हळद पिकाला चांगलाच फटका बसला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Rainपाऊस