रस्त्यासाठी ठिय्या

By Admin | Updated: June 6, 2014 00:08 IST2014-06-06T00:08:33+5:302014-06-06T00:08:33+5:30

शहरातील जुना वर्धा रोड येथील रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व जीवन प्राधिकरण अंतर्गत टाकण्यात येणारी नळाच्या पाईपलाईनची जोडणी लगेच करावी, या मागणीकरिता प्रहाराचे

Stretch for the road | रस्त्यासाठी ठिय्या

रस्त्यासाठी ठिय्या

प्रहारचे आंदोलन लेखी आश्‍वासनाने मागे
आर्वी : शहरातील जुना वर्धा रोड येथील रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे व जीवन प्राधिकरण अंतर्गत टाकण्यात येणारी नळाच्या पाईपलाईनची जोडणी लगेच करावी, या मागणीकरिता प्रहाराचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप व माजी तालुकाध्यक्ष सुधीर जाचक यांच्या नेतृत्वात भोंग्याच्या कर्कश आवाजात नगर पालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शहरातील मध्यभागी असलेल्या जुना वर्धा रोडचे बांधकाम  मागील चार ते पाच महिन्यांपासून कासव गतीने सुरू आहे. रस्त्याचे बांधकाम टप्प्या टप्प्यात न करता संपूर्ण रस्ता हा ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यातच भर म्हणून जीवन प्राधिकरणने रस्त्याच्या कडेला नळाची पाईप लाईन टाकण्याकरिता २ वेळा रस्ता फोडला. पण ते कामही संथगतीने सुरू असल्यने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होते.  या मागण्या लवकरात लवकर निकाली काढल्या जाईल, तसेच प्राधिकरणचे कमही लवकर पूर्न होईल, या आशयाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी अनिल झामरे, सुनील देशमुख, ज्ञानदेव जगताप, अंकुश गोटेफोडे, सागर सोनटक्के, महेश खोडके, पवन बडघरे, निखील रवाळे, जहकर, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Stretch for the road