शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मदतीनंतर निवळला तणाव

By admin | Updated: May 15, 2017 00:29 IST

येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गिमाटेक्स कंपनीतील भगवान गायकवाड, अंबादास चिंंचोळकर आणि

रात्रभर मृतदेह रुग्णालयात : उपजिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गिमाटेक्स कंपनीतील भगवान गायकवाड, अंबादास चिंंचोळकर आणि किशोर नगराळे या तीन कामगारांसह आटोचालक नवीन मून यांचा मृत्यू तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या मृतांना कंपनीकडून आर्थिक मदत देण्याच्या मागणीकरिता कामगारांनी मृत कामगारांचे शवविच्छेदन रोखून धरले होते. यावर कंपनीने या कामगारांच्या परिवाराला प्रत्येकी चार आणि आॅटोचालकाला दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत वाढलेला तणाव रविवारी दुपारी निवळला. तोडगा निघाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना आज आ. समीर कुणावार, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या उपस्थितीत धनादेश वितरीत करण्यात करण्यात आले. याच वेळी बाजार समितीच्यावतीने प्रत्येक कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत अ‍ॅड. कोठारी यांनी जाहीर केली. कंपनीने प्रारंभी मदत नाकारल्याने संतप्त कामगारांनी कामबंद आंदोलन करून रात्री १२ वाजता अखेरची पाळी बंद केली. मृतक कामगार कुटुंबियांना गिमाटेक्स व्यवस्थापनाकडून जोपर्यंत आर्थिक मदत दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणलेले मृतदेह ताब्यात घेण्यास मृतकांच्या कुटुंबियांनी व कामगारांनी नकार दिला. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. परिणामी, रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांच्या कार्यालयात बैठक सुरू होती. यावेळी आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, कामगार नेते आफताफ खान तसेच गिमाटेक्सच्यावतीने व्यवस्थापक शाकीर खान पठाण उपस्थित होते. चर्चेअंती गिमाटेक्स व्यवस्थापनाने मृतकांच्या कुटुंंबियांना २.५० लाखांची मदत कबुल केली; पण कामगार प्रतिनिधींनी मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १२ लाख देण्यात यावे, अशी मागणी केली. यामुळे रात्री तोडगा मिळू शकला नाही. या विषयावर आज पुन्हा सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात चर्चा झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी पडोळे स्वत: उपस्थित झाले. तसेच आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, कामगार नेते आफताफ खान, माजी जि.प. सदस्य मधुसूदन हरणे तर व्यवस्थापकाकडून शाकीर खान पठाण, ओम जोशी, बबला कोयर, विनोद जैस्वाल उपस्थित होते. यावेळी मृतक कामगार कुटुंबियांच्या सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. चर्चेअंती तोडगा निघाल्याने मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेवून अंत्यसंस्कार पार पाडले. तसेच कामगारांनी आज दुसऱ्या पाळीपासून ३ वाजता काम सुरू केले. चर्चेच्या वेळी माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, न.प. पाणीपुरवठा सभापती अंकुश ठाकुर, माजी पं.स. सदस्य वामन चंदनखेडे, शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी तसेच कामगार प्रतिनिधी, मृतक कुटुंबियांचे नातेवाईक आदी उपस्थित होते. आमदारांच्या हस्ते धनादेश वितरित मृत कामगार कुटुंबीयांना प्रत्येकी चार व मृतक आटोचालक मून यांच्या कुटुंबियांना दोन लाखांच्या मदतीचे धनादेश मृताच्या कुटुंबियांना आ. समीर कुणावार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आ. कुणावार यांनी वैयक्तिक २५ हजार रुपये रोख मृतकांच्या कुटुंबियांना दिले. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधींतर्गत मृतकाच्या कुटुंबियांना १ लाख रुपये सहाय्य मिळवून देण्याचे आ. कुणावार यांनी जाहीर केले. मृत कामगार कुटुंबियांना प्रॉव्हिडंट फंड ईन्शुरन्स अंतर्गत किमान चार ते साडे चार लाख रुपये, ग्रॅज्युटी रक्कम तसेच गिमाटेक्स कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचा पगार मिळणार असल्याचे व्यवस्थापक पठाण यांनी सांगितले. मृतक कामगार कुटुंबियांना प्रत्येकी एकूण ११ ते १२ लाख रुपये मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.