शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील काम थांबवा

By admin | Updated: May 9, 2017 01:10 IST

शहरालगच्या उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीत कमळ तलावात काही पक्षांसाठी अधिवासाची जागा होती.

दोन ग्रामपंचायतींचा विरोध : सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगच्या उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीत कमळ तलावात काही पक्षांसाठी अधिवासाची जागा होती. जनहित मुक्तांगण प्रकल्पासाठी या अधिवासावरच जेसीबीचा घाला पडलेला आहे. त्यामुळे पाणपक्षी सैरभैर झाले आहेत. परिणामी, अधिवासाची शासन लेखी कमळ तलाव संरक्षीत पक्षी अधिवास अशी नोंद घेवून शांतता भंग होईल असे उपक्रम राबविण्यात येवू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उमरी (मेघे)चे उपसरपंच सचिन खोसे, सिंदी (मेघे)चे प्रभारी सरपंच उत्कर्ष देशमुख यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतच्या हद्दीतील कमळ तलावाची जागा असली तरी ग्रामपंचायतीला पूर्णत: अंधारात ठेवून जिल्हा प्रशासन व जनहित मंच यांच्यामार्फत मुक्तागंण प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतीने कमळ तलाव आतापर्यंत जोपासला. येथे दुर्मीळ पाणपक्षांचे आदर्श प्रजणनस्थळ निर्माण झाले. दुर्मीळ पक्षांचा सध्या विणीचा हंगाम सुरू आहे. अशाचवेळी येथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात येते आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने लेखी कमळ तलाव संरक्षीत पक्षी अधिवास अशी नोंद करून पक्षी अधिवासाला शांतता भंग करणारे उपक्रम त्वरीत थांबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत उमरी (मेघे) व सिंदी (मेघे) यांनी केली आहे. सदर अधिवास धोक्यात आणण्याचे प्रकल्प राबविल्यास गेल्यास लोक चळवळ उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.या बाबींवर आक्षेपआयटीआय टेकडी परिसरात सदर काम होत आहे. येथे बोटींग, पिकनिक स्थळ उभारण्यात येत आहे. त्यासाठी अभ्यासाविणाच सिमेंटीकरण होणार आहे. यामुळे या परिसरात सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या दैंनदिन जीवनावर परिणाम होणार आहे. एका खाजगी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून कारंजे, फुडस्टॉल, रंगमंच, व्यायामशाळा, योग केंद्र, पदपाथ उभारण्यात येत आहे. हा प्रकार ग्रा. पं. ला विश्वासात न घेता सुरू असल्याचे निवेदनात नमुद आहे.