शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी-विनोबा परिवाराची बदनामी थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय मंडळाकडे केली. माऊस्कर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा सर्वोदय मंडळाने १२ फेब्रुवारीला बैठक बोलावून या गंभीर प्रकरणाची दखल घेतली.

ठळक मुद्देजमीन लीज प्रकरण : जिल्हा सर्वोदय मंडळाने सर्वसेवा संघाचे टोचले कान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोपूरी परिसरातील सर्व सेवा संघाच्या जमिनी खाजगी लोकांच्या घशात खालण्याच्या प्रकरणाने जिल्ह्यातील गांधीवादी संतप्त झाले आहेत. या प्रकरणी सर्व सेवा संघाची भूमिका चूकीची असल्याचा मतप्रवाह सर्वत्र उमटला आहे. याच पार्श्वभूमीवर मातृ संस्था असलेल्या सर्व सेवा संघाचे वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने कान टोचले असून गांधी-विनोबा परिवाराची बदनामी होईल, असे कृत्य करू नका असा सल्ला त्यांना दिला आहे.नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय मंडळाकडे केली. माऊस्कर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा सर्वोदय मंडळाने १२ फेब्रुवारीला बैठक बोलावून या गंभीर प्रकरणाची दखल घेतली.या बैठकीत गांधी-विनोबा परिवाराची बदनामी होऊ नये शिवाय सदर प्रकरणात स्नेह संबधनातून तोडगा काढण्याबाबत भूमिका घेण्याचे ठरले. तसेच सर्वसेवा संघाने नेमके काय कृत्य केले, याची माहिती घेण्याकरिता दामोधर उघडे व प्रमोद टाले या दोन सदस्यांची समिती नियुक्त करून त्यांच्याकडून गुरूवारी या प्रकरणाचा अहवाल मागविला. या अहवालात चर्मालयाची वास्तू व डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याचे सर्वोदय मंडळाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तोडफोडीची कारवाई स्थगीत करण्यात यावी. सर्व बाबींचा कायदेशीर निपटारा झाल्याशिवाय पुढे पाऊल उचलू नये, असे लेखी पत्राव्दारे जिल्हा सर्वोदय मंडळाने सर्वसेवा संघाला कळविले आहे. मातृ संस्था असल्यामुळे आपण या बाबीचा निश्चितपणे विचार करून गांधी व विनोबा परिवाराची बदनामी होणार नाही, यासाठी दक्षता घ्या, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. सर्वोदय मंडळाच्यावतीने अध्यक्ष मोहन खैरकार यांनी हे पत्र दिले आहे.वनविभागाने तोडलेल्या झाडांची केली मोजणीसर्व सेवा संघाने गोपूरी परिसरातील चर्मालय इमारत जमिनदोस्त करून या परिसरातील ४० वर अधिक झाडांची कत्तल केली. या प्रकरणी नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुरुवारी वनविभागाच्या तीन सदस्यीय समितीने मोक्का पाहणी करून लाकडाचे मोजमाप केले.तसेच कुठलीही परवानगी न घेता तोडलेल्या झाडांची मोजणी केली. राऊंड आॅफीसर उमेश शिरपूरकर, वनरक्षक निलेश राऊत, धनराज मजरे आदी उपस्थित होते. त्यांनी लाकडाची मोजणी करून संपूर्ण माहिती गोळा केली. यावेळी माजी सरपंच बाळकृष्ण माऊस्कर, ग्रा.प. सदस्य रणजीत इवनाथे, पंकज काचोळे, सागर सबाने, अशांक कावळे उपस्थित होते. हे प्रकरण पुढे काय नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग