शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजनेतील बंधार्‍यात घोळ

By admin | Updated: May 31, 2014 00:07 IST

शासकीय योजनेनुसार बंधारा न बांधता त्यात घोळ करण्यात आल्याचा आरोप विरूळ (आकाजी) येथील माजी सरपंचांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा येथे तक्रारीद्वारे केला आहे. याकडे लक्ष देत

विरूळ (आकाजी) : शासकीय योजनेनुसार बंधारा न बांधता त्यात घोळ करण्यात आल्याचा आरोप विरूळ (आकाजी) येथील माजी सरपंचांनी  भूजल संरक्षण विभाग वर्धा येथे तक्रारीद्वारे केला आहे. याकडे लक्ष देत कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५0 ला रूपये खर्च करून नवीन विहीर, टाकी, व पाईपलाईनचे काम सुरू आहे. डिसेंबर २0१३ ला या कामाची सुरूवात झाली. विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.  या विहिरीला लागूनच नाल्यात याच योजनेंतर्गत पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने बंधार्‍याची निर्मिती करण्यात आली. नियमानुसार या बंधार्‍याची खोली ६ मीटर असणे गरजेचे होते. परंतु संबंधित ठेकेदार ठाकरे याने ५ मीटर खोली करून यावर संरक्षण भिंत उभारली. ही बाब माजी सरपंच बाबाराव मानकर यांच्या लक्षात येताच त्यांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा कार्यालयात याबाबत तक्रार नोंदविली. या तक्रारीची दखल घेत या विभागाचे संबंधित अधिकारी महाजन व पाटील यांनी सदर बंधार्‍याला भेट देवून पाहणी केली. त्यांनाही या बंधार्‍याची खोली १ मीटर कमी दिसली. त्यांनीही सदर ठेकेदाराला १ मीटर खोली करण्याची सूचना दिली. परंतु सदर ठेकेदाराने अधिकार्‍यांनाही न जुमानता ५ मीटरच खोलीकरण करून बंधार्‍याची निर्मिती केली. त्यामुळे सदर बंधार्‍यात घोळ झाल्याचा आरोपही माजी सरपंच मानकर यांनी भूजल संरक्षण विभागाकडे केला आहे. त्याचप्रकारे नवीन बंधार्‍यात आलेल्या विहिरीचे खोलीकरण कमीच असल्याचेही मानकर त्यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवर लावलेली मोटरची वायरिंग ही कमी दर्जाची वापरल्याने ही वायरिंग वारंवार जळत असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद रहात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बांधकामात भ्रष्टाचार करीत असलेल्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मानकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.(वार्ताहर)