शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

बंदीस्त असलेला महात्मा गांधींचा पुतळा अखेर हटविला

By admin | Updated: February 7, 2015 01:23 IST

सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता.

वर्धा : सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता. गत ३० वर्षांपासून बांधून असलेला हा पुतळा अखेर गावकऱ्यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हलविण्यात आला. याबाबत थोडक्यात वत्त असे की, येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात तत्कालीन मुख्यमंत्री वसंत नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९७० रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. सन १९९५-९६ मध्ये एका अज्ञात समाज कंटकाने मध्यरात्री दगड मारून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली होती. यावरून शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासन विरूद्ध गावकरी, शिवसैनिक यांच्यात दंगल घडून आली होती. तेव्हापासून हा पुतळा झाकून ठेवला होता. अशातच ६ डिसेंबर २०१४ रोजीच्या ग्रामसभेत हा पुतळा हलविण्याबाबत ठराव घेण्यात आला. ठरावाची प्रत सरपंच गीता झाडे, ग्रा. पं. सदस्य आशिष कुचेवार, ग्रामविकास अधिकारी व्ही. जी. जोगे यांच्यासह गावकऱ्यांना तसेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आली. सदर प्रांगणामध्ये राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असल्याने नवप्रवाह संस्था द्वारा संचालीत न्यु स्टार स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान निर्णय घेत अखेर आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार प्रिती डुडुलकर, सरपंच गीता झाडे, उपसरपंच राम मेहत्रे, तलाठी शैलेष देशमुख, ग्राम विस्तार अधिकारी जोगे, पोलीस पाटील महेश टेकाम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांना श्रद्धाजंली अर्पण करून त्यांचा पुतळा काढून प्रशासनाच्या सुपूर्द करण्यात आला.(प्रतिनिधी)