शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीत कंत्राटदारांचे राज्य

By admin | Updated: November 10, 2014 22:49 IST

स्थानिक वीज वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कंत्राटदाराकडून घरगुती व कृषीपंप जोडणीकरिता लूट सुरू आहे. याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून उघड झाले आहे.

सेलू : स्थानिक वीज वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कंत्राटदाराकडून घरगुती व कृषीपंप जोडणीकरिता लूट सुरू आहे. याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे अनेक घटनांवरून उघड झाले आहे.अनेक वीज ग्राहकांनी घरी नवीन मीटरसाठी अर्ज केले तर काहींनी कृषीपंपासाठी अर्ज केले. कंत्राटदारांनी या ग्राहकांची दिशाभूल करून लाखो रुपये गोळा केले़ अनेकांना वीज जोडणीही दिली नाही. स्थानिक वीज कंपनीचे अभियंता अशा कामाचे प्राकलन तयार करून वरिष्ठांकडे मंजुरीकरिता पाठवितात; पण अधिकारी हे काम कंत्राटदाराकडे आहे, त्यालाच रक्कम द्या, असे सांगत आहेत. यामुळे कंत्राटदार मनात येईल तेवढी रक्कम घेतो. यातच काहीेंना जोडणी मिळते तर काहींना ताटकळत ठेवण्यात येते. हा प्रकार सेलू उपविभागात सर्रास सुरू आहे. काही धनाढ्य लोकांनी या कंत्राटदारांना पैसा देऊन आपली कामे काढून घेतली आहेत़ यात अनेकांचे प्लॉट, रस्ते, इमारतींपासून गेलेले अनेक वर्षांपूर्वीचे खांब व तारा त्वरितच हलविल्याचे सेलू परिसरात दिसून येत आहे. इश्वर नामक कंत्राटदार या अधिकाऱ्यांच्या कृपेने मस्तवाल झाला असून अलिकडे वीज ग्राहकांकडून नगदी नसेल तर चेकनेदेखील लाखोंच्या रकमा घेतल्याचे भक्कम पुरावे हाती आले आहेत़ या कंत्राटदाराला असलेल्या पाठबळाचे ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ असे अर्थकारण होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. सेलू वीज वितरण कंपनीचा कारभार अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी सुरू असून नाममात्र कामांसाठी हजारो रुपयांची देयके कंत्राटदारांच्या नावावर काढण्याचा सपाटा सुरू आहे. यातील काही हिस्सा जिल्हास्तरावरही अधिकाऱ्यांना पोहोचता केला जात असल्याचे कंत्राटदार खुलेआम सांगतात़ यामुळेच की काय, या प्रकारावर कारवाई होत नसल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)