वर्धा-बुटीबोरी बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:34+5:30

बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे. कंपनीच्या बसेस स्वतंत्र असून पूर्णत: सुरक्षित आहे. सर्व कर्मचारी ३ शिफ्टमध्ये कंपनीला सेवा देतात.

Start the Wardha-Butibori bus | वर्धा-बुटीबोरी बस सुरू करा

वर्धा-बुटीबोरी बस सुरू करा

Next
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-बुटीबोरी दरम्यान अनेक खासगी कंपन्यांतील कर्मचारी ये-जा करतात. याकरिता कंपनीची बसफेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बुटीबोरी येथील इंडोरामा कंपनीमध्ये वर्ध्यातील ८० कर्मचारी कार्यरत आहेत. १ जुलै २०२० पासून संबंधित कंपनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, सीमाबदीमुळे कंपनीची बससेवा बंद आहे.
कंपनीच्या बसेस स्वतंत्र असून पूर्णत: सुरक्षित आहे. सर्व कर्मचारी ३ शिफ्टमध्ये कंपनीला सेवा देतात. बसची मर्यादा ५० आसनांची असून एका शिफ्टमध्ये २५-३० कर्मचारी प्रवास करतील, त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाईल व इतर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही. आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगाराची समस्या सुटेल, असे यावेळी जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी बससेवेला परवानगी देण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांची समस्या तातडीने निकालात काढावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे, प्रवीण तमगिरे, अजय शेवाळकर आदींनी दिला.

Web Title: Start the Wardha-Butibori bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.