शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कांजण्या, गालगुंडची पसरतेय साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो.

ठळक मुद्देलहान मुलांमध्ये अधिक प्रमाण : काळजी घेण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणात बदल होताच जिल्ह्यात संसर्गजन्य असलेल्या कांजण्या आणि गालगुंड आजाराने डोके वर काढले असून लहान मुलांमध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.कांजण्या हा आजार ‘व्हेरिसेला झोस्टर’ नावाच्या विषाणूंमुळे होत असून वयाच्या १५ व्या वर्षांपर्यंत एकदा तरी या आजाराची लागण होते. उन्हाळ्यात जानेवारी ते मे दरम्यान कांजण्याचे रुग्ण आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांच्या कालावधीत या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग दोन दिवस आधी अथवा सहा दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो. ‘मम्प्स’ अर्थात गालगुंड हा पसरणाऱ्या विषाणूंपासून होणारा संसर्ग असून लहान मुलांमध्ये याचे मोठे प्रमाण आहे. या आजाराचा विषाणू तोंडावाटे अथवा नाकावाटे हवेण्या कणांमार्फत प्रवेश करतो. आणि हवेवाटे पसरतो. विषाणूच्या संसर्गाच्या १४ ते २५ दिवसांनंतर गालगुंडची लक्षणे जाणवतात. बाधित व्यक्तीला त्याचे तोंड आणि नाक शिंकताना आणि खोकताना इतर व्यक्तीला संसर्ग पसरू नये म्हणून झाकून ठेवणे गरजेचे आहे. गालगुंडची सुजलेला नाजूक जबडा, डोकेदुखी, स्रायूंचे दुखणे, जबड्यामध्ये सूज येणे, तोंड कोरडे पडणे, भूक कमी होणे, ताप, अशक्तपणा, वृषणांमध्ये दुखणे, चिडचिडेपणा ही तर ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे, हलकेसे पोट दुखणे, अस्वस्थता अशी कांजण्या आजाराची लक्षणे आहेत.जिल्हा रुग्णालयात अद्याप रुग्ण नाहीतजिल्ह्यात या आजाराने डोके वर काढले असले तरी सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण दाखल झालेले नाहीत, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल येळणे यांनी दिली.कांजण्या आणि गालगुंड हे दोन्ही संसर्गजन्य आजार असून संपर्कातून या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होतो. शहरात या आजाराचे रुग्ण आढळून येत असून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. याकरिता पालकांनी पाल्याला आजारी असताना शाळेत पाठविणे टाळावे, जेणेकरून आजाराचा फैलाव होणार नाही. बाधित व्यक्तीने आवश्यक औषधोपचार घेत पाण्याने अंग पुसावे, भरपूर पाणी प्यावे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. सचिन पावडे, बालरोगतज्ज्ञ, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य