खेळांमुळे कामांच्या तणावातून होतेय मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:30+5:30

प्रत्येकाने मैदानावर गेले पाहिजे, ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन होणे आजची गरज झाली आहे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श यांनी केले तर आभार महेश डोईजड यांनी मानले.

Sports are relieving work stress | खेळांमुळे कामांच्या तणावातून होतेय मुक्तता

खेळांमुळे कामांच्या तणावातून होतेय मुक्तता

Next
ठळक मुद्देदिलीप मुरुमकर : न्यायालयाची प्रिमिअर लिग स्पर्धा


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाजातील प्रत्येक घटक आह सध्या कामाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. सततच्या कामामुळे मानसिक ताणही वाढत असल्याने खेळांमुळे या तणावातून मुक्तता होते, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी केले.
स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा व सत्र न्यायालयांतर्गत न्यायिक अधिकारी, अधिवक्ता व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय प्रिमिअर लिग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मिश्रा, सातपुते, विशेष पोलीस पथकातील उईके, जिल्हा न्यायालय प्रबंधक आर.एन. वाडकर, जिल्हा सरकारी अधिवक्ता तकवाले यांची उपस्थिती होती. प्रत्येकाने मैदानावर गेले पाहिजे, ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन होणे आजची गरज झाली आहे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श यांनी केले तर आभार महेश डोईजड यांनी मानले.
शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर नाणेफेक करुन जजेस-११ विरुद्ध लगान-११ यांच्यामधील सामन्याने प्रिमिअर लिंग किकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रिमिअर लिगचे क्रिकेट सामने २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला अ‍ॅड. विनय घुडे, अ‍ॅड. श्रीजित जोशी, अ‍ॅड. सुशांत राऊत, अ‍ॅड. विशाल ठोंबरे, अ‍ॅड. अमोल कोटंबकर, खतीब, जयंत महाजन, जयंत सबाने, विलास सोनपितळे, अ‍ॅड. प्रसाद सोईतकर, मुकुंद धाकटे, आर. के. मिश्रा, धिरज भोयर, अ‍ॅड. एस. झेड. नाईक, मनोज साळवे, अभय पाल यांच्यासह न्यायालयातील न्यायिक अधिकारी, अधिवक्ता व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Sports are relieving work stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.