शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

ंंआर्वी-उपसा सिंचन योजनेला गती

By admin | Updated: June 18, 2016 01:29 IST

वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले.

रोहणा : वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले. पण पाटचऱ्या नसल्यामुळे सिंचन होत नव्हते त्यामुळे आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी जनमंचद्वारे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत या सिंचन योजनेला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गत दोन वर्षापासून मुख्य कालव्यातून वर्षाला तीन ते चार वेळा पाणी सोडण्यात येते. पण पाटचऱ्या नसल्यामुळे कालव्याच्याच काठावर असणारे शेतकरी डिझेल इंजीनद्वारे सिंचन करीत असतात. मुख्य कालव्याच्या डाव्या बाजूकडील शेतीचे क्षेत्र उंचवट्यामुळे सिंचनाच्या सुविधेपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना निम्न वर्धा सिंचन प्रकल्पावर आर्वी तालुक्यात उपसा-सिंचन योजना बांधण्याचा प्रस्ताव जनमंचाद्वारे २००९ साली देण्यात आला होता. सदर मागणी लक्षात घेऊन लोअर वर्धा प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आर्वी-उपसा सिंचन योजनेसाठी आर्थिक तरतूदीला मान्यता प्रदान करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात प्रकल्पाचे काम निधी अभावी रेंगाळले होते. त्यामुळे जनमंचद्वारे आर्वी-उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत उपसा सिंचन योजनेचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्वी उपसा सिंचन योजनेचा इपीसी (इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कंस्ट्रक्शन) पद्धतीद्वारे सुक्ष्म सिंचन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फणिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे, विजय राऊत यांनी पाठपुरावा केला.(वार्ताहर)