शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महार्गावरील गावांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 06:00 IST

या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले व समस्या मांडल्या.

ठळक मुद्देबुटीबोरी-तुळजापूर मार्ग : अधिकाऱ्यांशी आमदारांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुटीबोरी-तुळजापूर महामार्गाच्या वर्धा विधानसभा मतदारसंघाशी संबंधित समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी नरेश वडेटवार यांच्याशी नागपूर येथे आमदार डॉ. पंकज भोयर यांची १२ डिसेंबरला बैठक झाली. या बैठकीत या महामार्गाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्याची मागणी आमदार डॉ. भोयर यांनी केली. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याची हमी प्रादेशिक अधिकारी नरेश वडेटवार यांनी दिली.या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले व समस्या मांडल्या.अपघात टाळण्याकरिता व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. वर्ध्यावरून आणि नागपूरवरून सेलू शहरात प्रवेश करताना, पिपरी (मेघे) परिसरात, जुनापाणी चौकातील पोचरस्त्यांचे काम तातडीने करण्यात यावे, जुनापाणी चौकातील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्यात यावे, उमरी (मेघे) परिसरात महामार्गावरील सात ठिकाणी पोचरस्ता जोडणीचे काम झालेले नाही. हे काम तातडीने हाती घेण्यात यावे, अशी मागणी आमदार भोयर यांनी केली. सावंगी (मेघे) परिसरात रेल्वे उड्डाणपुलामुळे विभागल्या गेलेल्या वस्तीत दोन्ही बाजूंना आवागमन करण्याकरिता पुलाखालून रस्त्याची सोय करण्यात आलेली नाही. ती करण्यात यावी तसेच पवनार परिसरात बसस्थानक चौकात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नाली बांधकाम व दुभाजकावर विद्युत दिवे लावण्याचे काम तसेच बसस्थानक चौकात गतिरोधक लावण्याचे काम करायचे आहे. यासोबत अंडरपास किंवा पाथवे बनवायचा आहे. या सर्व कामांना प्राधान्य देण्यात यावे, सालोड परिसरात महामार्गाला जोडणारा पोचरस्ता व प्रवासी निवाºयाचे काम, सिंदी (मेघे) परिसरातील सर्व पोचरस्ते तयार करण्याचे काम करावयाचे आहे. ही कामेही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, दिलीप बिल्डकॉनचे व्यवस्थापक उत्तमसिंग, सेलूचे माजी नगराध्यक्ष राजेश जयस्वाल, माजी जि. प. सदस्य सुनीता ढवळे, आशीष कुचेवार, सचिन खोसे, अजय गोंडाळे, शब्बीरअली सय्यद, शकुंतला नगराळे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :highwayमहामार्ग