शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत दीड लाखावर ॲन्टिजेन किट्सचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

  जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट कमी पडून लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या अचानक कोविड तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकिट्सच्या तुटवड्याने गरीब, गरजूंची गैरसोय : रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून संशयितांची ॲन्टिजेन चाचणी केल्या जात आहे. आतार्यंत सुमारे दीड लाखांवर ॲन्टिजेन किट्सचा वापर करण्यात आला असल्याने आता मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन तपासणी किट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवश्यक किट उपलब्ध होत नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागत असून चाचण्या करायच्या कशा, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडू लागला आहे.     जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात ॲन्टिजेन चाचणीसाठी रांगा लागत आहे. हे टाळण्यासाठी अनेकजण खासगी पॅथलॅबकडे वळले आहेत. मात्र, दोन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ॲन्टिजेन किट कमी पडून लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या अचानक कोविड तपासणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी, सेवाग्राम, उपजिल्हा रुग्णालयासोबतच ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या जास्त आहे. पण, ॲन्टिजेन किटचा तुटवडा असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णसंख्या वाढली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दररोज तीन हजारावर चाचण्या करण्यात येत असून ॲन्टिजेन चाचणी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रशासनाकडे ॲन्टिजेन किट्सची मागणी करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेकडे ॲन्टिजेन किट्स असून लवकरच आणखी किट्स उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या