शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अंदोरी वळण रस्त्यावर बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

देवळी नजीकच्या अंदोरी वळणावरील परिसरात लहान मोठी पंधरा गावे असून यामध्ये आंजी, अंदोरी, गौळ, अडेगाव, वाटखेडा, गिरोली, राळेगाव आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून त्यांचा देवळीसोबत दररोजचा संपर्क असतो. परंतु देवळीच्या शिवारात प्रवेश करतानाच अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने या सर्व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबीएसएफच्या माजी जवानाच्या मृत्यूने रोष : तीन दिवसांत मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिलीप बिल्डकॉन तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या तुघलकी कारभारामुळे दोन दिवसापूर्वी अंदोरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात बीएसएफच्या माजी जवानाचा बळी गेला. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतत्प नागरिकांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या नेतृत्वात बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घेराव करुन कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला.देवळी नजीकच्या अंदोरी वळणावरील परिसरात लहान मोठी पंधरा गावे असून यामध्ये आंजी, अंदोरी, गौळ, अडेगाव, वाटखेडा, गिरोली, राळेगाव आदी प्रमुख गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून त्यांचा देवळीसोबत दररोजचा संपर्क असतो. परंतु देवळीच्या शिवारात प्रवेश करतानाच अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने या सर्व गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. महामार्ग प्रशासनाने बांधकामादरम्यान राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करुनही महामार्ग प्रशासन व कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताची मालिका सुरुच राहिली. दोन दिवसापूर्वी माजी जवान संजय कुळसुंगे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त करून मोटारवाहनांची तोडफोड केली. तसेच गुरुवारी बिल्डकॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालून अंदोरी वळणाचे डाव्या बाजूला चारपदरी महामार्गाचे डिव्हायडर तोडून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मिडल ओपनिंग करणे, ब्लिकींग लाईट लावणे, अंदोरी रस्ता वळणावर गतिरोधक तयार करणे तसेच महामार्गाच्या नियमानुसार जंक्शन टॉवर बोर्डाची व्यवस्था करण्यासोबतच वळणावर सेप्टीगार्ड तयार करण्याची मागणी करण्यात आली. देवळीचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हलकर व नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांच्या मध्यस्थीने येत्या तीन दिवसात पर्यायी व्यवस्था करण्याची हमी बिल्डकॉनच्या अधिकाºयांनी दिल्याने नागरिकांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. तीन दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये राजेश बकाने, बंडू जोशी, जब्बार तंवर, दिलीप कारोटकर, संजय कामडी, संतोष भोयर, गजानन डोंगरे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.