शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामच्या कोविड सेंटरमधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देमृत्युपश्चात नातलगांना दिला केवळ मोबाईल : परिवार विलगीकरणात असल्याने पोस्टाद्वारे पाठविली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : आर्वी येथील कोरोनाबाधित महिलेला उपचाराकरिता सेवाग्राम येथील कोविड सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे.पुष्पा जेठानंद ठाकूर (६३) रा. आर्वी असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना कोरोनाचे निदान झाल्याने ३० जुलैला सेवाग्राम रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या परवानगीने मृतदेह घेण्याकरिता त्यांचा मुलगा सेवाग्राम रुग्णालयात गेला असता त्यांना आईच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसले नाही. त्यामुळे विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी दागिने नव्हते, असे सांगून केवळ मोबाईल परत केला. वर्ध्यातील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, आईच्या मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या ठाकूर परिवाराने कर्मचाऱ्यांना कोणतीही विचारपूस केली नाही किंवा तत्काळ तक्रारही दाखल केली नाही. अख्खे कुटुंब विलगीकरणात असल्याने त्यांना पोलिसांत जाऊन तक्रारही करता आली नाही.अखेर या दु:खातून सावरत मुलगा अजय जेठानंद ठाकूर यांनी याप्रकरणासंदर्भात आईच्या अंगावरील सोन्याच्या दोन बांगड्या व कानातले असा जवळपास १ लाखाचा ऐवज लंपास केल्याची पोस्टाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यासह मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, माजी आमदार, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. कोविड सेंटरमधील या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रुग्णाच्या अंगावरील दागिने लंपास करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पोलिसांसह रुग्णालय प्रशासना समोरही आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.सेवाग्राम येथील कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या माझ्या आईच्या अंगावर दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व कानातले, असे एक लाख रुपयांचे दागिने होते. पण, ते आम्हाला परत न देता केवळ मोबाईल दिला. त्यामुळे आई गेल्याच्या दु: खातून सावरत याप्रकरणी पोस्टव्दारे तक्रार केली असून त्या आरोपीचा शोध घ्यावा, हिच अपेक्षा आहे.- अजय ठाकूर, मृताचा मुलगा.सेवाग्रामच्या कोविड सेंटरमधून मृतकाच्या अंगावरील दागिने चोरीस गेले, यासंदर्भात आम्हाला अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त होताच तपास करुन आरोपीचा शोध घेतला जाईल.- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.

टॅग्स :Thiefचोर