शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

फुटक्या नाल्या, डबके अन् धुळीचे रस्ते

By admin | Updated: May 20, 2016 01:49 IST

लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरूवारी सिंदी(मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डेहनकर ले-आऊट,...

लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गुरूवारी सिंदी(मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डेहनकर ले-आऊट, चिंतामणी नगरी, बोभाटे ले-आऊट, झाडे ले-आऊट, मारोतीभाऊ समाधी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या परिसरात ग्रा.पं. प्रशासनाकडून सुविधा दिल्या जात नसल्याची ओरडच नागरिकांकडून करण्यात येत होती. गत कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या, नव्याने बांधलेल्या फुटक्या नाल्या, कच्चे रस्ते, त्यातही मुरूम व गिट्टी वर आलेली आणि सांडपाण्याचे डबके या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात काही भागात नाल्यांचे बांधकाम करण्यात आले; पण निकृष्ट दर्जामुळे अनेक नाल्या फुटल्या आहेत. काही भागात सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्याच करण्यात आलेल्या नाही. यामुळे मोकळ्या जागेत सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. शिवाय डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील अंगणवाडीही डबक्यातच बांधण्यात आली आहे. अंगणवाडीच्या मागील भागात सांडपाणी साचले असून झुडपे वाढली आहेत. या अंगणवाडी बालकांवर कसे संस्कार केले जात असतील, हा प्रश्नच आहे. पावसाळ्यात टेकडीवरील पाणी सखल भागात येत असल्याने स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात डबके साचते. परिणामी, चिखल होऊन नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होते. या भागातून सिंदी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाला मोठ्या प्रमाणात कर मिळतो; पण त्या तुलनेत सुविधा पुरविल्या जात नाहीत. रस्त्याची दुरवस्था, नाल्या फुटलेल्या आणि कचऱ्याचे साम्राज्य यामुळे आरोग्याचा प्रश्न असतो. खुल्या जागांचाही विकास करण्यात आलेला नाही. यामुळे चिमुकल्यांना खेळण्याकरिता उद्यानच नाही. सांडपाण्याचा निचरा हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचेही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.