शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

नॉनक्रिमिलेअर व जात प्रमाणपत्रांसाठी ताटकळ

By admin | Updated: October 25, 2014 22:46 IST

मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून नागरिकांना नॉनक्रिमिलेअर तसेच जातप्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यासाठी नागरिकांना पुलगाव येथील तहसील कार्यालयाचे उंबरठे

नाचणगाव : मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून नागरिकांना नॉनक्रिमिलेअर तसेच जातप्रमाणपत्र मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ यासाठी नागरिकांना पुलगाव येथील तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होत आहे़ पुलगाव शहर तसेच लगतचा ग्रामीण भाग या सर्वांना आपले जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पुलगाव येथील नायब तहसील कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. किंबहुना या कार्यालयातून सदर प्रमाणपत्र तयार होतात व नंतर ते उपविभागीय कार्यालय वर्धा येथे पाठविण्यात येतात़ यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर ते पुलगाव तहसील कार्यालयाला प्राप्त होते़ यानंतर त्या प्रमाणपत्रांचे वितरण संबंधित नागरिकांना केले जाते; पण गत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयातून गेलेली प्रमाणपत्रे वर्धेवरून आलीच नसल्याचे तहसील कार्यालयास भेट दिल्यावर सांगण्यात आले़ नागरिकांच्या सुविधेच्या असलेली यंत्रणा मात्र नागरिकांच्या कामासाठी कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. प्रमाणपत्राअभावी शासकीय कामात अडथळा येत आहे; पण तेच प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अडथळा आणला जात आहे़ या प्रकारामुळे नागरिक हतबल झाले आहे़ आपल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याकरिता ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी, तहसील कार्यालयाच्या चकरा मारताना ते मेटकुटीस आले आहेत़ संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देत त्वरित प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे़(वार्ताहर)