सात दिवसांनंतर उघडली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:15+5:30

बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलै पासून संचारबंदी लागू करुन सर्व व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती केली होती.

Shops opened after seven days | सात दिवसांनंतर उघडली दुकाने

सात दिवसांनंतर उघडली दुकाने

Next
ठळक मुद्देअ‍ॅन्टीजेन टेस्टची सक्ती नाही : चर्चेअंती व्यावसायिकांनी घेतला संप मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : ताप, सर्दी, खोकला, घशाचा त्रास होणे आदी लक्षणे आढळून आल्यास त्यांनीच कोविड तपासणी करावी, कोणत्याही व्यावसायिकावर कोविड चाचणीची सक्ती करण्यात येणार नाही, अशी चर्चा माजी आमदार अमर काळे यांच्यासोबत झाल्यानंतर व्यावसायिकांनी बेमुदत संप मागे घेऊन तब्बल सात दिवसांनंतर दुकाने उघडली.
बैठकीला उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ नंदकिशोर कोल्हे, नायब तहसीलदार विनायक मगर यांची उपस्थिती होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलै पासून संचारबंदी लागू करुन सर्व व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची सक्ती केली होती. या आदेशाविरोधात व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या आदेशाविरोधात व्यावसायिकांनी बेमुदत संप पुकारला होता. व्यावसायिकांची परवड आणि नागरिकांची परिस्थिती बघता माजी आमदार काळे यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून पालकमंत्र्यांशी व्यावसायिकांची चर्चा घडवून आणली.
चर्चेदरम्यान लक्षणे आढळून आले तरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी, अन्यथा सक्ती नको, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शनिवारी सायंकाळी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक चर्चेअंती यावर तोडगा निघाल्याने व्यावसायिकांनी बेमुदत संप मागे घेतला. बैठकीला व्यापारी संघटनेचे ज्येष्ठ व्यावसायिक धनपतलाल टावरी, श्यामसुंदर राठी, नानू साखरे, श्रीकांत कर्मकर, हातीम भाई, रमेश सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ सुवर्णकार ज्ञानचंद् संकलेचा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Shops opened after seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार