शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजाराचे आमिष देऊन शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 10:36 IST

आरोपी शिक्षक दीपक मंडलिक याने पीडितेच्या हातात दोन हजार रुपये देऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले.

ठळक मुद्देशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल धुमनखेडा येथील जि.प. शाळेतील प्रकार

वर्धा : दोन हजाराचे आमिष देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. ही घटना तालुक्यातील धुमनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली असून या प्रकरणातील आरोपी शिक्षकावर पोस्को तसेच भादंविच्या विविध कलमान्वये समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

शिक्षक दीपक मंडलिक रा. हिंगणघाट याने २ डिसेंबरला पीडितेला वगळता वर्गातील सर्व विद्यार्थिनींना सुट्टी दिली. तर वर्गखोलीत असलेल्या पीडितेला गणित सोडवण्यास सांगितले. दरम्यान, आरोपी शिक्षक दीपक याने पीडितेच्या हातात दोन हजार रुपये देऊन तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तिच्याशी अश्लील चाळे केले. घाबरलेल्या पीडितेने अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत शिक्षकाने दिलेले पैसे फाडून थेट दीपकच्या तोंडावर फेकून वर्गखोलीतून पळ काढला.

घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिल्यावर पीडितेच्या कुटुंबीयांनीही शिक्षकाला विचारणा केली. त्यावेळी आरोपी शिक्षकाने चूक झाल्याचे कबूल करून माफी मागितली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर प्रकार गंभीर असल्याने थेट समुद्रपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी शिक्षक दीपक मंडलिक (४०) रा. हिंगणघाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, समुद्रपूरचे ठाणेदार प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलीस उपनिरीक्षक राम खोत, रंजना झिलपे, प्रेम देव, सराटे, दीपक वानखेडे करीत आहेत.

पीडिता शाळेत जाण्यास द्यायची नकार

दोन हजाराचे आमिष देऊन शाळेतील शिक्षकाकडूनच अश्लील चाळे करण्यात आल्याने पीडिता ही चांगलीच घाबरली होती. कुटुंबीयांनी शाळेत जा असे म्हणताच ती शाळेत जाण्यासाठी थेट नकार देत होती. कुटुंबीयांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर सदर धक्कादायक प्रकार उजेडात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी