नराधम बापाकडून पोटच्या मुलीचा लैंगिक छळ; आरोपीस अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

By चैतन्य जोशी | Updated: September 7, 2022 18:48 IST2022-09-07T18:45:09+5:302022-09-07T18:48:49+5:30

पीडित मुलीने तिच्या आजीला सोबत घेत थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.

Sexual harassment of unborn daughter by murderous father; Accused father arrested | नराधम बापाकडून पोटच्या मुलीचा लैंगिक छळ; आरोपीस अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

नराधम बापाकडून पोटच्या मुलीचा लैंगिक छळ; आरोपीस अटक, रामनगर पोलिसांची कारवाई

वर्धा : नराधम बापाने त्याच्याच पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी ७ रोजी पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन नराधम बापास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१४ वर्षीय पीडितेच्या वडिलांच्या त्रासामुळे तिची आई २०१९ मध्येच त्यांना सोडून माहेरी निघून गेली. तेव्हापासून पीडिता तिच्या आजी,आजोबा आणि वडिलांसोबत राहत होती. मागील तीन महिन्यांपासून नराधम बाप पीडितेशी अश्लिल चाळे करीत होता. याची माहिती तिने तिच्या आजीला दिली होती. आजीने हटकूनही नराधम बाप सुधरला नाही अन् त्याने पोटच्या मुलीचा लैंगिक छळ सुरुच ठेवला. अखेर पीडिता ही नागपूर येथील रहिवासी तिच्या काकाकडे राहण्यास गेली. अखेर पीडित मुलीने तिच्या आजीला सोबत घेत थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ नराधम बापास बेड्या ठोकल्या.

मोबाईलवर दाखवायचा अश्लिल फोटो 

पीडित मुलगी आंघोळीला गेली असता नराधम बाप तिच्याकडे वाईट नजरेने डोकावून पाहायचा. इतकेच नव्हे तर त्याच्या मोबाईलमधील अश्लिल फोटो तिला दाखवायचा. पीडितेने हटकले असता वडिलाने तिला मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून पीडिता ही नागपूरला तिच्या काकाकडे राहण्यास गेली होती.

Web Title: Sexual harassment of unborn daughter by murderous father; Accused father arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.