शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

देयकाविना ग्राहकांना सेट टॉप बॉक्स

By admin | Updated: January 8, 2016 02:45 IST

शासनाच्या आदेशानुसार सर्वच केबल धारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती करण्याात आली आहे;

दुरूस्तीबाबत संभ्रम : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन हिंगणघाट : शासनाच्या आदेशानुसार सर्वच केबल धारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती करण्याात आली आहे; मात्र यात ग्राहकांची लूट होत आहे. एकाही वितरकाकडून ग्राहकाला त्याचे देयक देण्यात आले नाही. शिवाय त्याच्या किमतीतही तफावत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात नागरिकांना योग्य माहिती पुरविण्याची मागणी आपच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आाहे. शासकीय नियमानुसार १ जानेवारी २०१६ पासून टी.व्ही. चॅनल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स अत्यावश्यक करण्यात आला आहे. यात येथील केबल आॅपरेटर घेवून जनतेची आर्थिक फसवणूक सुरू आहे. बाजारात या बॉक्सची किंमत बाजारमुल्यानुसार ६०० रुपये आहे; परंतु केबलधारक हा ग्राहकांना १८०० रुपयात देत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्याचे कुठलेही देयक ग्राहकाला दिल्या जात नाही. या संदर्भात शासनाचे घेतलेल्या निर्णय व नियमाची माहिती जनतेला द्यावी. या संदर्भात प्रत्येक महिन्याला वेगळा रिचार्ज जनतेच्या खिशातून जाणार आहे काय? तसेच भविष्यात हा सेट टॉप बॉक्स खराब झाल्यास पुढची सर्व्हिस कोण देणार? ते सुटे भाग कुठे मिळणार? याबाबत जनतेला काहीच माहिती नाही. या संदर्भात आपण शहरातील सर्व केबल धारकांना बोलावून योग्य त्या सूचना शासकीय निर्देशानुसार देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही अवस्था केवळ एका हिंगणघाट तालुक्यात नसून संपूर्ण जिल्ह्यात आहे. याकडे जिल्हा प्रशासनानेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी) शंभर रुपयांच्या मुद्रांकशुल्काची सक्ती रद्द करावीहिंगणघाट - शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक कार्यासाठी व रेशन पत्रिकेसाठी १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार येथील तहसीलदार व सहनिबंधक कार्यालयाच्यावतीने शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे सुरू केले होते; परंतु येथील नायब तहसीलदाराने आपला तुघलकी कारभार चालवित पुन्हा शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्काची सक्ती केल्याचा आरोप आपच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यामुळे नागरिकांवर विनाकारण दंड बसत आहे. यात शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.