शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दारू विकणाऱ्या व पिणाऱ्यास रहिवासी दाखला नाही

By admin | Updated: August 24, 2014 00:09 IST

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना मुबलक प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी दारू मिळते. तळेगावात तर गत काही वर्षांपासून ठिकठिकाणी दारूचे गुत्थे आहेत. त्यातही पोलिसांचा आशीर्वाद

तळेगाव (टालाटुले) : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना मुबलक प्रमाणात पाहिजे त्या ठिकाणी दारू मिळते. तळेगावात तर गत काही वर्षांपासून ठिकठिकाणी दारूचे गुत्थे आहेत. त्यातही पोलिसांचा आशीर्वाद असल्याने दारूविक्रेते अधिकच निर्ढावले आहेत. यामुळे आता दारूबंदीकरिता ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यामुळे सध्या गावात शांतता असून जर कुणी दारू विक्री करताना वा पिऊन दिसला तर त्याला रहिवासी दाखल देण्यात दिल्या जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. गावात मिळत असलेल्या दारूमुळे गावात अनेक वेळा तंटे झाल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी तर माजी सरपंचालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे माजी सरपंचाने कारवाई पोटी दारूबंदीकरिता पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते. दारूमुळे अनेक कुटुंब उघडयावर आले आहे. यासाठी पहिल्यांदा ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी सर्व पक्षीय सभा घेत गावात १४ आॅगस्टपासून दारूबंदीची घोषणा केली. गावभर जनजागृती करण्याकरिता पोस्टर लावले. त्यात दारूसोडा अन्यथा गाव सोडा असा संदेश दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी दारूबंदी सहमत असहमत सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये चार हजार महिलांनी नोंदणी करून घेतली. यानंतर ग्रामपंचायतमध्ये दारूविक्रेत्याची बैठक बोलावून त्यांनी शिल्लक असलेल्या माल विकण्याची परवानगी मागितली. ग्रामपंचायतीने १३ आॅगस्ट पर्यंत विका नंतर १४ आॅगस्टपासून बंदीची मोहीम आहे, असे सांगितले. दारूविक्रेत्यांनीही ते मान्य केले. ठाणेदार विजय मगर यांनी गावकऱ्यांने स्वत: कायदा हातात न घेता दारूविक्री करताना कोणी आढल्यास व पिऊन दिसल्यास माहिती द्या, मी लगेच पोलिसांना घेवून पोहचेल. शिवाय त्यांनी भ्रमनध्वनीही सभेमध्ये दिला. दारूविक्री करणाऱ्याला तीन महिने जमानत नाही व कलम ३२८ नुसार गुन्हा व पिणाऱ्यास कलम ८५ दाखल करणार, असे सांगितले. सरपंच अतुल तिमांडे यांनी गावात शांतता नांदावी यासाठी दारूबंदी बाबत गावकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली. गावात दारूबंदीची मोहीम राबविण्यात येत असल्याने गावात सध्या शांतता दिसत आहे. यानिमित्त ग्रामपंचायत सचिवालयात पार पडलेल्या अल्लीपूरचे नवीन ठाणेदार मगर, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, सरपंच अतुल तिमांडे उपस्थित होते.(वार्ताहर)