शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कलम ४ ई म्हणते...करमणूक कर सरकारने वसूल करावा

By admin | Updated: November 6, 2016 00:36 IST

सेट टॉप बॉक्स व अन्य केबल कनेक्शन धारकांकडून वसूल करण्यात येणारा करमणूक कर हा आजपर्यंत केबल आॅपरेटर्सकडून वसूल

व्हॉईस आॅफ डेमोक्रसीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन : कर वसुलीसाठी केबल आॅपरेटर्सची पिळवणूक वर्धा : सेट टॉप बॉक्स व अन्य केबल कनेक्शन धारकांकडून वसूल करण्यात येणारा करमणूक कर हा आजपर्यंत केबल आॅपरेटर्सकडून वसूल करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. वास्तविक पाहता हे काम महाराष्ट्र शुल्क अधिनियम १९२३ मधील कलम ४-ई नुसार सरकारचेच आहे. ठेकेदारी पद्धतीने एजन्ट नेमून करमणूक कर विभागाने कर वसुली करावी, असा नियम असताना हे काम केबल टी.व्ही. आॅपरेटर्सवरच लादून त्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप व्हॉईस आॅफ डेमोक्रॉसी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या एका निवेदनातून केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी राज्यभरात अद्याप कुठेच झाली नसल्याने संघटनेमार्फत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्याची माहिती व्हॉईस आॅफ डेमोक्रॉसीचे अध्यक्ष तापस कुमार बोस व सदस्य दामोधर धर्माळे, महेंद्र शास्त्रकार, शशिकांत पराते यांनी दिलेल्या निवेदनातून दिली. अधिनियम १९२३ मधील कलम ४-ई बाबत केबल आॅपरेटर्स व जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न व्हॉईस आॅफ डेमोक्रॉसीच्यावतीने केला जात असल्याचे नमूद करीत तापस कुमार बोस म्हणाले की, केबल व डीटीएच सेवेवरील करमणूक शुल्क वसुल करण्याचे अधिकारी हे केवळ करमणूक कर विभागालाच आहेत; परंतु याउलट परिस्थिती निर्माण करून या विभागातर्फे राज्यभरातील केबल आॅपरेटर्स यांच्याकडूनच कर वसुली करवून घेतली जात आहे. यापुढे केबल आॅपरेटर्सकडून कर वसुलीचे काम करवून न घेता एजन्ट नेमून करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना मोहन नायडू, जितेंद्र जुडे, प्रशांत भोयर, राजू चौधरी, गोविंद तडस, हरिष कणोजे, विजय महेशगौरी, महेश राजूरकर, मनीष बिडवाईक, फिरोज शेख, दिलीप पोटे, ज्ञानेश्वर माळोदे, गणेश कडू, अरुण देवगीरकर, केवल माखन, मधुकर ढवळे, अतुल दाते, राजू लोखंडे, प्रकाश भोयर, गणेश सरोदे, ओम ठाकरे, राजू सोनटक्के, उमेश शर्मा यांच्यासह केबल आॅपरेटर्स सहभागी झाले होते.(प्रतिनिधी) शासनाला दहा हजार कोटींचा फटका२००४ नंतर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतरही शासनाने कर वसुली संदर्भात निर्णय न घेतल्याने १० हजार कोटींचा फटका शासनाला बसला आहे. याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी व्हॉईस आॅफ डेमोक्रॉसीने केली आहे.२००४ पासून केबल आॅपरेटर केबलधारकांकडून करमणूक कर वसुल करीत नसतानादेखील त्या कराची झळ आॅपरेटर्सच्या खिशाला बसली आहे. आॅपरेटर्सनी सरकारकडे कराच्या माध्यमातून जमा केलेले कोट्यवधी रुपये सरकारने परत द्यावेत, अशी मागणीदेखील व्हॉईस आॅफ डेमोक्रॉसीने केली आहे.