शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकारचा बैठा सत्याग्रह

By admin | Updated: June 11, 2014 00:14 IST

‘नाफेड’ने खरेदी केलेल्या तूर, हरभरा या शेतमालाच्या मोबदल्याचे ५ कोटी ४४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, या मागणीकरिता किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

वर्धा : ‘नाफेड’ने खरेदी केलेल्या तूर, हरभरा या शेतमालाच्या मोबदल्याचे ५ कोटी ४४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, या मागणीकरिता किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले़ किसान अधिकार अभियानने ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा हालचाली सुरू झाल्या. सेलू येथे तूर खरेदीतील चुकारे न दिल्याबाबत ‘नाफेड’चे जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये दूरध्वनीवरून कळवूनही आपण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता, कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही. यावर २४ तासांच्या आंत समक्ष भेटून स्पष्टीकरण द्यावे, अशी तंबी देण्यात आली आहे. किसान अधिकार अभियानने शेतमाल खरेदीची रक्कम मिळण्याकरिता आंदोलन सुरू केल्यानंतर नाफेडकडून रक्कम येताच त्वरित ही रक्कम खरेदी-विक्री संघामार्फत संबंधितांना देण्यात येईल, असे २३ मे रोजी दिलेल्या पत्रात मान्य केले होते; पण त्यावर जिल्हा पणन अधिकारी कार्यालय स्तरावरून कोणतीही कारवाई झाली नाही़ नाफेडच्यावतीने सेलू तालुक्यात ६ मार्च रोजी १५० क्विंटल ५ किलो तुरीची खरेदी करण्यात आली़ त्याचे ६ लाख ४५ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. शिवाय नाफेडने जिल्ह्यात खरेदी केलेल्या हरभऱ्याचे ४ कोटी ८१ लाख रुपये आणि इतर ठिकाणी खरेदी केलेल्या तुरीचे ५७ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, याकरिता किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे यांच्या नेतृत्वात २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर किसान अधिकारच्या आंदोलकांना दोन दिवसांची वेळ मागण्यात आली होती. नाफेडचे जिल्हा पणन अधिकारी शेख बिलाल यांना पत्रही देण्यात आले होते; पण १५ दिवस लोटले असताना कारवाई झाली नाही़ हरभरा आणि तुरीच्या खरेदीची रक्कम कधी मिळणार, याबाबत शेतकरी तसेच किसान अधिकार अभियानला माहिती देण्यात आली नाही. यामुळे तुरीच्या खरेदीतील थकित रकमेच्या चुकाऱ्याबाबत काय निर्णय झाला, याच्या लेखी माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून वाट पाहणार असल्याचे पत्र देत आंदोलन सुरू करण्यात आले़ आंदोलनात अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे यांच्यासह गजानन पाहुणे, निवृत्ती तडस, विलास चंदनखेडे, पद्माकर कुत्तरमारे, प्रमोद फुलझेले आदी शेतकरी सहभागी झाले.(कार्यालय प्रतिनिधी)