शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, आरोग्य कर्मचाऱ्यांसह १८ व्यक्ती कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दवाखान्यात कार्यरत औषध निर्माण अधिकाऱ्याचीही दीड महिन्यांपासून सिंदी (रे) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावल्याने येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकेळझरात आरोग्य यंत्रणेची मदार एकाच अधिकाऱ्यावर : गृहविलगीकरणात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : सरपंच, आरोग्य सेवक यांच्यासह एकूण १८ जणांना गावात कोरोनाची बाधा झाली. हे सर्व बाधित रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.   यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, एकाच अधिकाऱ्यावर मदार आहे.आरोग्य उपकेंद्रातील दोन्ही आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य उपकेंद्राचे कामकाज एकट्या आरोग्य अधिकाऱ्याला सांभाळावे लागत आहे. पाच हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात काम करताना आरोग्य अधिकाऱ्याची तारांबळ उडत आहे, तर येथील अलोपॅथी दवाखान्यात कार्यरत औषध निर्माण अधिकाऱ्याचीही दीड महिन्यांपासून सिंदी (रे) च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावल्याने येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे २५ एप्रिलपासून येथे कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्याने आणखी कामाचा ताण वाढला आहे. ग्रामीण भागात पहिल्या लाटेचा  प्रभाव जाणवला नव्हता मात्र दुसऱ्या लाटेत नागरिकांची होरपळ होत असल्याचे दिसून येत आहे. 

मानधन नाही तर काम नाही; आशा वर्करने घेतली भूमिका

आरोग्य उपकेंद्रात एकूण सहा आशा वर्कर काम करीत आहेत. कोरोनाकाळापासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून चोखपणे त्या कर्तव्य बजावत आहेत. पैकी दोन आशा सेविकांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येते. गावात अलीकडच्या काळात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आशा सेविकांनी आमचा व आमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून विनामानधन यापुढे काम करणार नसल्याची भूमिका घेत तीन दिवसांपासून कामावर जाणे बंद केले आहे. ग्रामपंचायतीने मानधन द्यावे, अशी आशा सेविकांची मागणी आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्र सध्या आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांशिवाय ‘सायलेंट मोड’वर आले आहे. याचा परिणाम कोविडच्या कामावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्य उपकेंद्रात काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने होम क्वारंटाईन आहेत, तर आशा सेविकांनी मानधन देणार असाल, तरच काम करणार, अशी भूमिका घेतल्याने कामाचा भार एकट्यावर आला आहे.-डॉ. पुष्पा छाडी, आरोग्य अधिकारी, केळझर.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या