शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बनावट रॉयल्टीद्वारे होतेय रेतीची वाहतूक

By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST

लिलाव झाले नसल्याने सध्या वर्धा नदीतून वाळू उपस्याला मनाई आहे. असे असले तरी बनावट रॉयल्टीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

तळेगाव (श्याम.पंत) : लिलाव झाले नसल्याने सध्या वर्धा नदीतून वाळू उपस्याला मनाई आहे. असे असले तरी बनावट रॉयल्टीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महसूल बुडवून चोरी करण्याची नवी शक्क्लच वाळू तस्करांनी लढविली आहे. बनावट रॉयल्टीद्वारे वाळूची वाहतूक करण्याची शक्कल ही महसूल विभागामार्फतच चोरट्यांना मिळाल्याचे बोलल्या जात आहे.
वाळू तस्करीचे धागेदोरे खोलपर्यंत असल्याने लहान-सहान अधिकाऱ्यांना ती थांबविणे कठीण आहे. नदी पात्रातून वाळू उपस्याला मनाई असताना चक्क जेसीबीने वाळू उपसा होत असेल तर हा प्रकार थांबविणार कोण ? हा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे वाळू उपसा बंद असल्याचा देखावा करून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करून महसूल बुडविण्याचा धंदा रेती तस्करांनी चालविला आहे. यात अधिकाऱ्यांचेच पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. नदी पात्रातून वाळूचा उपसा करून ही वाळू वाहतूक करताना ती साठवून ठेवली जात आहे. याकरिता वाळू तस्करांनी बनावट रॉयल्टी ट्रक चालकांजवळ देण्याची शक्कल लढविली आहे. ही बनावट रॉयल्टी सोबत असली की एखाद्या अधिकाऱ्यांने वाळूची वाहतूक करताना वाहन तपासले तर ती दाखवून वाहतूक करणे सुकर होते. हा प्रकार तालुक्यात राजरोसपणे सुरू आहे. नदी नाल्यातून वाळू उपसा करून चढ्या दराने वाळू विकण्याचा प्रकार महसूल विभागाला रोखणे दुरापास्त झाले आहे. वाळू तस्कर दरदिवसाला नवनवीन क्लुप्त्या लढवून महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ‘नहले पे दहला’ अशी खेळी करीत वाळू वाहतूक बिनधास्तपणे करीत आहेत.
जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का असा रॉयल्टीत उल्लेख असणे अनिवार्य आहे. मात्र हल्ली वाळू तस्करांनी नदीपात्रातून वाळू उपसा करून ती वाहतूक करताना बनावट रॉयल्टी देण्याचा धंदा सुरू केला आहे.
या अफलातून प्रकाराने वाळू तस्करीतून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एवढेच नव्हे तर क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणक्ली जात आहे. असे असले तरी महसूल बुडावित असताना महसूल अधिकारी या बाबीकडे डोळेझाक करीत आहेत. सध्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या वाळू माफियांचे देवाण-घेवाण चालत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे.(वार्ताहर)