शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्यातील रिधोरा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही.  या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. अनेक जण येथे सेल्फीही काढण्यात दंग दिसून येतात. पण येथे गर्दी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जबाबदारी असलेला पाटबंधारे   विभाग मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देपर्यटकांची दररोज उसळते गर्दी : अनुचित प्रकार घडण्याची शक्यता; सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क घोराड : सेलू तालुक्यात चार धरणांचा समावेश आहे.  या धरणांना पर्यटन  स्थळाचे  महत्त्व प्राप्त होत आहे. पण यापैकी असणाऱ्या रिधोरा धरणाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. हे धरण यावेळी पूर्णतः भरले असल्याने पाणी धरणाच्या भिंतीवरून वाहते. पाण्यात डुंबण्याचा हा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करीत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने येथे गर्दी टाळण्यासाठी काहीवेळा उपाययोजना केल्या. पण या उपाययोजना कायमस्वरुपी दिसून येत नाही. शुक्रवारी या धरणावर फेरफटका मारला असता सकाळी ७ वाजता पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या ठिकाणी पर्यटक उभे राहतात, तेथे असलेले लोखंडी कुंपण तुटलेले आहे, तर असणारे कुंपण कधी कोसळेल याचा नेम नाही.  या तुटलेल्या कुंपणाजवळच पर्यटक उभे राहून धरणातील पाण्याचा व निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. अनेक जण येथे सेल्फीही काढण्यात दंग दिसून येतात. पण येथे गर्दी होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जबाबदारी असलेला पाटबंधारे   विभाग मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात पर्यटनाला वाव असतानासुद्धा संबधित विभाग याचा विकास करण्यास दुर्लक्ष करीत आहे.  या धरणावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

तो फलक नावापुरताधरणावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर प्रशासनाने लाकडी कुंपण घातले व त्यावर फलक लावला. त्या फलकावर कोणीही गर्दी करू नये व वाहन जप्त करण्याची सूचना करून कारवाई करण्यात येईल, असे लिहिले असले तरी त्या फलकाजवळच पर्यटकांची वाहने उभी राहत आहेत. त्यामुळे हा फलक नावापुरताच असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटन