शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पाण्यासह वैरणाचाही प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

खुबगाव : पाणी टंचाईमुळे परिसरातील ग्रामस्थांना पाण्याकरिता पायपीट करावी लागते. ही समस्या भविष्यात उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. पाण्याच्या समस्येसोबत जनावरांच्या वैरणाचा प्रश्नही अधिक गंभीर होऊ लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या भयावह स्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

या भागात सिंचन व्यवस्था नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने परिसरातील गावांना याचा फटका सहन करावा लागतो. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटू शकली नाही. भुजल पातळी चांगली असतानाही शासकीय यंत्रणेने या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या भागात एकही प्रकल्प उभारल्या गेला नाही. त्यामुळे आज ही परिस्थती निर्माण झाली आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्याची मागणी प्रलंबित आहे.

प्रत्येक वर्षी थातूर-मातूर योजना राबविली जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र त्याचे फलित होत नाही. योजनेवर आजवर झालेला खर्च लक्षात पाहता या निधीतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना अंमलात येवू शकली असती. परंतु याकडे कुणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे आजही नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागते. या भागात पाण्याची मुबलकता आहे. पण पाणी नागरिकांपर्यंत पोहचविण्याची यंत्रणा नाही. दिवसेंदिवस ग्रामीण भागाची स्थिती दयनीय होत असून कमी अधिक पावसामुळे पिके, चारा यावर दुष्परिणाम झाला. शेतकरी, शेतमजूर कर्जबाजारी होऊन आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे कवडीमोल दराने जनावरे विक्री काढावी लागते. निसर्गही हुलकावनी देत असल्याने शेतकरी हतबल झाला. जनावरांकरिता चारा व पाणी नाही. शेतकर्‍यांना जनावरे कशी पाळायची असा प्रश्न आहे. जनावरांशिवाय शेतीची मशागत शक्य नाही. दुध व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍यांना प्रश्न पडला आहे. या समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)